Nikhil Wagle Sarkarnama
पुणे

Nikhil Wagle : निखील वागळेंवर पुण्यात हल्ला; 'हे' आहे कारण ?

Pune BJP : पुण्यात निखिल वागळे यांचा निर्भय बनो हा कार्यक्रम

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : पुणे शहरात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि मुक्त पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वागळे यांचे भाषण होते. मात्र, या सभेला उधळून लावू, असा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला जोरदार विरोध केला. तसेच पुण्यातील खंडूजी बाबा चौक येथे वागळेंच्या वाहन फोडण्यात आले. वाहनाव अंडी आणि दगडफेक केली.

निखिल वागळेंनी (Nikhil Wagle) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर ट्विट करून भाजपवर हल्ला चढवला होता. अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, अशा कडक शब्दात वागळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरूनच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर पुण्यात वागळेंच्या होणाऱ्या कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, निखिल वागळे यांचा निर्भय बनो हा कार्यक्रम पुण्यात होणार होता. हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो हा आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावण्यात येईल, असा इशारा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिला होता. त्यानंतर पुण्यात आलेल्या वागळेंवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. गाडीवर अंडी, शाई फेकण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वागळे, वादग्रस्त लिखाण करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण पुण्यात कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा दमच पुणे भाजपने दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शहर शांत राहावे, यासाठी पोलिस प्रशासनाने वागळेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशीही मागणी भाजप शहराध्यक्ष घाटेंनी केली होती. यानंतरही हा कार्यक्रम होणार असल्याचे वागळेंनी सांगितल होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT