Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

BJP strategy elections: 48 हजार मतांच्या पराभवाची रूखरूख : पुणे पदवीधरसाठी भाजपने कसली कंबर; घेतला महत्वाचा निर्णय

BJP important decision after defeat News : महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी 2020 च्या निवडणुकीत महायुतीचे संग्राम देशमुख यांचा 48 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवातून धडा घेत भाजपने आता आक्रमक रणनीती आखली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच कंबर कसली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे.

गेल्या 2020 च्या निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराचा 48 हजार मतांनी पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पांडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. याचबरोबर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी आमदार संजय केणेकर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांचीही ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पांडे यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी समन्वयाची जबाबदारी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात 58 विधानसभा मतदारसंघ, 240 मंडल आणि 20 हजारांहून अधिक बूथ असून, पक्षाची तळागाळापर्यंतची रचना नुकतीच पूर्ण झाली आहे.

महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांनी 2020 च्या निवडणुकीत महायुतीचे संग्राम देशमुख यांचा 48 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवातून धडा घेत भाजपने आता आक्रमक रणनीती आखली आहे. राजेश पांडे गेल्या 44 वर्षांपासून संघ परिवार आणि भाजपमध्ये सक्रिय आहेत. 2014 मध्ये पुणे महानगर सरचिटणीस, 2019 मध्ये प्रदेश सचिव आणि 2025 मध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2021 मध्ये त्यांच्याकडे पुणे महापालिका निवडणूक प्रमुखाची जबाबदारी होती, मात्र त्यावेळी निवडणुका झाल्या नाहीत.

पांडे म्हणाले, “पुणे पदवीधर निवडणुकीत संघटनात्मक बांधणीच्या जोरावर भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन तयारी करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल.” भाजपकडून करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT