Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदेंची ताकद? फडणवीसांना घेरायचा प्लॅन होता? जरांगेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

Maratha Reservation Protest : "मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलं नसून ते कोणी संपवू शकत नाही, राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट लागू न झाल्यास येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू, राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही,"
Eknath Shinde, Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange addressing media from hospital, clarifying his stand on Maratha reservation protest and rejecting links to political agendas.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 05 Sep : आझाद मैदानात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केलं. पाच दिवस चाललेल्या या आंदोलनावर राज्य सरकारने यशस्वी तोडगा काढला.

मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आंदोलना आडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न सुरु होता. मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी मुंबईत ठाण मांडले होते का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले होते का? असे प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलनाबाबत खळबळजनक आरोप केले होते.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Eknath Shinde : "जीआर मनोज जरांगेंच्या संमतीनेच लागू तरीही मराठ्यांचे प्रश्न..."; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मात्र, संजय राऊतांच्या या आरोपांवर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रूग्णालयातून माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, "फडणवीसांना घेरायचे असते तर 'वर्षा'वर जाऊन घेरले असते.

शिंदे यांच्या ऐकण्यावर आंदोलन करायचे असते तर आरक्षण नकोच म्हटलं असतं. आपल्याला राजकारण नको, आरक्षण पाहिजे, हे दोन वर्षांत सिद्ध केलं आहे. त्यामुळे राऊत कोणत्या उद्देशाने म्हणाले हे माहीत नाही."

Eknath Shinde, Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, मराठा समाजाला ओबीसी घटकांत आरक्षण दिल्यास वीस टक्के नोकऱ्या घटणार!

दरम्यान, यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलं नसून ते कोणी संपवू शकत नाही, राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट लागू न झाल्यास येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू, राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही," असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com