Kasba by election : कसबा पोटनिवणुकीत भाजपने (BJP) हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपने रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता ब्राम्हण समाजात नाराजी पसरण्याची शक्यता शैलेश टिळक यांनीच व्यक्त केली आहे.
मुक्ता टिळक यांच्या रुपाने पुण्यामध्ये एकमेव ब्राम्हण आमदार होता. मात्र, त्यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे आता रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोथरुडची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
कोथरुडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे तिकिट भाजपने कट केले होते. तेथे भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली होती. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ब्राम्हण उमेदवाराचे तिकिट कापल्यामुळे भाजपवर ब्राम्हण महासंघ नाराज झाला होता. त्यांनी थेट पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली होती.
मात्र, नंतर पाटील त्यांची समजुत काढण्यात यशस्वी झाले होते. मात्र, आताही ब्राम्हण समाजावर आण्याय झाल्याची भावना असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कसबा मतदार संघात ब्राम्हण मतदारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे समाजाच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो, असे सांगितले जात आहे.
कसब्यामध्ये आतापर्यंत भाजपकडून ब्राम्हण उमेदवारच दिला गेला आहे. त्यामध्ये सध्याचे पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) येथून पाच वेळा निवडून आले होते. ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळाली होती. कसबा मतदार संघात एकूण २ लाख ७५ हजार ४२८ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ३८ हजार ५५० महिला आहेत. तर १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष मतदार आहेत. मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची सख्या सव्वादोन हजारांनी अधिक आहे.
दरम्यान, हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शैलेश टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आम्ही सांगितले होते की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. टिळक घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. अशा परिस्थितीत नैसर्गिकपणे घरच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळते. यामुळे आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती."
''आम्हाला आशा वाटत होती की, आम्हाला उमेदवारी मिळेल. पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर केले आहे. पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि रासने यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. ब्राह्मणसमाजावर अन्यायाची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे, असे शैलेश टिळक यांनी नमुद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.