Kasaba By-Election : टिळक कुटुंबाहेरील व्यक्तिला उमेदवारी देण्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण..

Jagtap Family : चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुखांचंही नाव केलं घोषीत
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Hemant Rasane News : महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत संबंधित आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याची परंपरा आहे. त्यानुसारच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मात्र कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही. येथे टिळक कुटंबाबाहेरील हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasaba By-Election) दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली.

येथे भाजपने (BJP) टिळक कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्यांचे कारण सांगितले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांनी मी शुक्रवारी रात्री टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन कसबा पेठेतील उमेदवार दिला आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांच्यावर नवीन जबाबदारी दिलीय. त्यांना भाजप सन्मानाचं स्थान देणार आहे. त्यांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचं सांगितलं."

Chandrakant Patil
Kasba By Election : भाजप ठरलं कसब्यातून रासनेंना उमेदवारी; धंगेकरांच्या नावाची फक्त औपचारीकताच बाकी?

चिंचवडमधील (Chinchwad) जागेवरून जागताप कुटंबियांत (Jagtap Family) वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे, याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांत कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असं स्पष्टंच सांगितलं.

Chandrakant Patil
Kasaba By Election : उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने म्हणाले, "गिरीश बापट यांच्या.."

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, "जगताप कुटुंबियांत उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. जगताप यांचा मुलगा लहान असला तरी त्यांनी मोठा समजदारपणा दाखविला आहे. समाजात पसरत असलेल्या अफवांबाबत त्यांनी ट्वीट करून कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं सांगितलं आहे."

तसेच पुढं बोलताना त्यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी यांचीही घोषणा केली. पाटील म्हणाले, "चिंचवडमधून अश्विन जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप (Shankar Jagtap) हे निवडणुकीचे प्रमुख असतील आणि शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर अश्विनी जगताप प्रमुख असतील. आता पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो".

Chandrakant Patil
Kasaba By-election News : कसबा पोटनिवडणुकीची रंगत वाढली; मनसेही आपल्या उमेदवाराची घोषणा करणार

भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. आता महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com