Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: शरद पवारांनी पुण्यात डाव टाकला! मतदानाच्या सहा दिवसापूर्वीच भाजप नेते गळाला

Pune Election Update: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे सहा दिवस बाकी राहिले आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News: शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला. ज्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, समित्र सहकारीबँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे यांचा समावेश होता.

या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांना फायदा होणार असल्याचे बोलले जाते. तर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे (Chetan Tupe) यांना धक्का मानला जात आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपामध्ये असलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश झाला आहे. याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांना होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.

त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा साहेबांना शब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

sharad pawar ncp party

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT