Jalna News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असताना मराठाड्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला झालाची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भोकरदन तालुक्यात बुधवारी रात्री ही घटना घडली.
महाविकास आघाडीचे भोकरदन विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत दानवे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. पण त्यांची गाडी पुढे गेल्याने दगड त्यांच्या ताफ्यातील मागे असलेल्या गाडीवर पडला. या घटनेत खांद्याला दगड लागल्याने राजेंद्र दसपुते हे जखमी झाले आहेत.
भोकरदन विधानसभा मतदार संघातून भाजपाचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पूत्र संतोष दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची मुख्य लढत राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्याशी होणार आहे. यापूर्वी, २००३ ते २००९ पर्यंत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्याआधी १९९०, १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्ये भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला होता.
जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव भोकरदन विधानसभा मतदारसंघात आहे. दलित मतदारांची संख्या सुमारे 14 टक्के आहे, तर आदिवासी मतदारांची संख्या ४ टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे १२ टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये मोठा फरक आहे. येथे केवळ 6 टक्के शहरी मतदार आहेत. तर बाकीचे सर्व ग्रामीण भागात राहणारे आहेत.
भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. मविआकडून मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीगटाकडून तीन वेळा आमदार राहिलेले चंद्रकांत दानवे यांना मैदानात उतरविले आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ३२ उमेदवार मैदानात आहेत. अपक्षांची संख्या १९ इतकी आहे. निवडणूक रिंगणात ३२ उमेदवार असले तरी येथील खरी लढत ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार दानवे विरुद्ध दानवे अशीच राहणार असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.