Ramtek Assembly election 2024
Ramtek Assembly election 2024Sarkarnama

Nana Patole : सुनील केदारांच्या धाकामुळे नाना पटोलेंची चुप्पी; रामटेकच्या बंडखोरीवर बोलण्यास नकार

Ramtek Assembly constituency: नागपूर ग्रामीणमधील उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत केदारांशिवाय कोणार हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. केदारांनी आघाडीच्या विरोधात जाऊन त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले होते.
Published on

Nagpur News: नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केलेली बंडखोरी आणि त्यांना साथ देत असलेले माजी मंत्री सुनील केदारांचीच चर्चा जोरात सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याची कोणी दखल घेतलेली नाही. केदारांच्या धाकामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा रामटेकच्या बंडखोरीवर बोलण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास टाळले असल्याचे दिसते.

"रामटेकमधील घडामोंडीची माहिती मागितली आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही आमची भूमिका आहे. मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कोण कोण नेते फिरत आहेत याची चौकशी केल्यानंतरच प्रतिक्रिया देण्यात येईल एवढे मोजके शब्द वापरून पटोले यांनी केदार आणि रामटेकेच खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर बोलणे टाळले.

 Ramtek Assembly election 2024
Sharad Pawar: अदानींच्या घरी शहांसोबत झालेल्या भेटीबाबत शरद पवारांनी सगळंच सांगितलं....

लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि नाना पटोले यांनी उमेदवार ठरवण्याचा आणि निवडण्याचा अधिकार केदार यांना दिला होता. येथील उमेदवार बदलला तर एकाही काँग्रेस नेत्याने त्यावर भाष्य केले नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणेही टाळले होते. सावनरेमध्ये केदार सांगतील तो उमेदवार असे अधिकृत पत्रच काँग्रेसने काढले होते.

नागपूर ग्रामीणमधील उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत केदारांशिवाय कोणार हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. केदारांनी महविकास आघाडीच्या विरोधात जाऊन हिंगणा आणि उमरडे विधानसभा मतमदारसंघात त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले होते. हिंगण्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश बंग यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकला होता.

 Ramtek Assembly election 2024
Rohit Pawar: पहाटेच्या शपथविधी, अदानींना विचारा काय घडलं? निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादांचा हा केविलवाणा प्रयत्न!

रामटेकमध्ये त्यांनी उघडपणे महाविकास आघाडीच्या विरोधात बंड केले पुकारले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव सेनेचे उमेदवार विशाल बरबटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नाना पटोले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्याकडून त्यांनी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती. एरवी कोणावरही व कुठल्याही मुद्यावर रोखठोक बोलणारे नाना पटोले यांनी केदारांबाबत सौम्य धोरण अवलंबल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com