जुन्नर नगरपरिषद निवडणुकीत युतीबाबत शिवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप करून भाजपने स्वतंत्र लढाईची घोषणा केली.
शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून उमेदवारांना AB फॉर्म देऊन युतीत विसंवाद निर्माण झाल्याचे भाजपने सांगितले.
माघारीच्या अंतिम दिवशी शिवसेनेच्या उमेदवाराने मागे न हटल्याने नगराध्यक्षपदासाठी भाजपचा अर्ज कायम ठेवला गेल्याचा आरोप आहे.
Junnar, 22 November : भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही. जुन्नर नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने युतीबाबात भाजपची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप नेत्या आशा बुचके यांनी केला आहे. शिवसेनेकडून फसवणूक झाल्याने जुन्नरच नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या सात जागांवर भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.
शिवसेनेकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात बोलताना आशा बुचके (Asha Buchke) म्हणाल्या, जुन्नर नगर परिषद निवडणुकीबाबत जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, मी अशी आमची संयुक्त बैठक झाली.
त्या बैठकीत भाजप-शिवसेना युती करण्याचे ठरले. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक, सहा, सातमध्ये भाजप (BJP), तर प्रभाग क्रमांक दोन ‘ब’मध्ये आणि प्रभाग क्रमांक आठ अ आणि ब मध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
शिवसेनेला नगराध्यक्षपद तसेच उर्वरीत सर्व प्रभागांत शिवसेनेला उमेदवारी देण्याचे ठरले होते. पक्ष नेत्यांनी त्यानुसार आपापल्या उमेदवारांना जोडपत्र दोन (एबी फॉर्म) देण्याचे ठरले होते. असे असताना शिवसेनेने प्रभाग क्रमांक सातमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या उमेदवारास जोडपत्र दोन दिल्यामुळे युतीत अडचण निर्माण झाली. तसेच, प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सुद्धा शिवसेनेने मधुकर काजळे यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करण्यास सांगितले.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन मिनिटे कमी असताना भाजपकडून तृप्ती परदेशी यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन दिवस युतीसाठी चर्चा होईल, असे वाटत होते. मात्र, वाटाघाटी न झाल्यामुळे युती संपुष्टात आल्याचे समजले जात होते.
माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे मधुकर काजळे यांचा प्रभाग क्रमांक सहामधून व तृप्ती परदेशी यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दोन वाजून पन्नास मिनिटांनी मागे घेण्याकरता नगरपालिका कार्यालयात जावे असे ठरले.
त्यानुसार भाजपच्या तृप्ती परदेशी ह्या नेत्यांसह माघार घेण्यासाठी गेल्या. मात्र, शिवसेनेचे मधुकर काजळे माघार घेण्यासाठी आलेच नाहीत, त्यामुळे परदेशी यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. शिवसेनेने भाजपला वारंवार फसवल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवसेनेचे काजळे आपली भूमिका सोयीनुसार वारंवार बदलत असल्याचे दिसून येते, असेही बुचके यांनी स्पष्ट केले.
Q1: शिवसेनेवर भाजपचा मुख्य आरोप काय आहे?
युतीच्या ठरलेल्या जागांवर शेवटच्या क्षणी उमेदवार बदलून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Q2: भाजप जुन्नरमध्ये किती जागांवर लढणार आहे?
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सातही जागांवर भाजप स्वतंत्र लढत देणार आहे.
Q3: कोणत्या उमेदवाराच्या अर्जावरुन वाद निर्माण झाला?
शिवसेनेचे मधुकर काजळे माघार न घेतल्याने भाजपच्या तृप्ती परदेशी यांच्या उमेदवारीवर वाद झाला.
Q4: युतीत कोणते प्रभाग आधी ठरले होते?
प्रभाग 1, 6, 7 भाजपकडे आणि प्रभाग 2B, 8A, 8B मध्ये मैत्रीपूर्ण लढत ठरली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.