Congress Leader News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भावाचा पालिका निवडणुकीत राजकीय गेम...कोणी फिरवली सूत्रे?; चर्चांना उधाण

Karad Nagar Palika Election 2025 : ऋतुराज मोरे यांची उमेदवारी छाननीत बाद झाली आणि अपक्ष अर्जही मागे घेतला. त्यामुळे कराड राजकारणात विरोधकांनी फसवलं की राजकीय डाव होता? अशी चर्चा रंगली आहे.
Rituraj More
Rituraj MoreSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे बंधू ऋतुराज मोरे यांनी काँग्रेस सोडून यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी दाखल केली होती, परंतु छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला.
अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी अपक्षतूनही माघार घेतल्याने शहरात “त्यांना फसवले की राजकीय गेम झाला?” अशी चर्चा रंगली आहे.
कराडमध्ये भाजप मजबूतपणे लढत असून विरोधी गटांतील एकवाक्यतेचा अभाव भाजपला लाभदायक ठरत आहे.

Karad, 22 November : कॉँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे बंधू आणि कऱ्हाड शहर (जि. सातारा) कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीतून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यशवंत विकास आघाडीच्या प्रमुखांची सही नसल्याने छाननीत मोरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.

आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्यामुळे त्यांनी कॉँग्रेसचा (Congress) हात सोडला आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अपक्ष राहिलेला अर्जही काढून घेतला. त्यांच्या माघारीने राजकीय वर्तुळात त्यांना फसवले की त्यांचा राजकीय गेम केला? अशी चर्चा रंगली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले शिवराज मोरे (Shivraj More) हे सध्या युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मोरे हे काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षापदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचे कॉँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संबंध येतो.

कराड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार फिल्डिंग लावून चार जागा त्यांच्याशी संलग्न असलेल्या अरुण जाधव यांच्या जनशक्ती आघाडीला देत नगराध्यक्षासह उर्वरित जागा या भाजपच्या कमळ चिन्हावर उभ्या केल्या आहेत. त्याचा विचार करून भाजप विरोधात सर्वांना एकत्र करण्यासाठी शहरातील नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला फारसे यश आले नसल्याचे माघारीदिवशी स्पष्ट झाले.

नेत्यांनी निवडणुकीसाठी पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरल्यामुळे एकवाक्यता न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चांमध्ये वेळ निघून गेली आणि भाजप विरोधात सर्व जण ताकदीने एकत्र येण्याचा डाव फसला. त्यामुळे सध्या भाजप विरोधात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबरोबर १५ उमेदवार हे कॉँग्रेसकडून उभे करण्यात आले आहेत.

Rituraj More
Karmala Politic's : मागील निवडणुकीतील सख्खे मित्र बागल-जगताप यंदा बनले कट्टर विरोधक

माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि उपमुख्यमंत्री शिंदे समर्थक राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी ही एकत्र आली आहे. त्यांनी नगराध्यक्षासह ३० उमेदवार उभे करून शहराचे गावपण टिकवून शांततामय सहजीवनासाठी आम्ही एकत्र आल्याचे जाहीर केले आहे.

कॉँग्रेसचे समीकरण लवकर न जुळल्याने आणि अन्य काही कारणांमुळे युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोरे यांचे बंधू ऋतुराज मोरे हे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे समर्थक राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर त्यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचे बंधू असूनही त्यांनी यशवंत विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्याची शहरात मोठी चर्चा झाली होती.

यशवंत विकास आघाडीच्या प्रमुखांची अर्जावर सही नसल्यामुळे छाननीत ऋतुराज मोरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्यामुळे कॉँग्रेसचा हात सोडलेल्या मोरे यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्ष राहिलेला अर्जही काढून घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या माघारीमुळे चर्चा सध्या शहरात सुरू असून, त्यांचा राजकीय गेम कोणी केला, अशी चर्चा शहरात होत आहे.

Rituraj More
Satara Politic's : मलकापूरमध्ये अतुल भोसले, मनोहर शिंदेची कमाल; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध

पवारांची माघार कोणासाठी?

कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी त्यांच्या पत्नीसह नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सध्या शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि उपमुख्यमंत्री शिंदे समर्थक राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी ही एकत्र आली आहे.

आघाडीच्या जागा वाटपात लोकशाही आघाडीला पवार यांनी अर्ज दाखल केलेला प्रभाग देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांना आघाडीच्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या अर्ज माघारीची शहरात चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मात्र त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Q1: ऋतुराज मोरे यांचा अर्ज का बाद झाला?
यशवंत विकास आघाडीच्या प्रमुखांची सही नसल्यामुळे अर्ज छाननीत बाद झाला.

Q2: त्यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी मागे का घेतली?
आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास असल्याने, परंतु शेवटी दोन्ही अर्ज मागे घेतले.

Q3: कराडमध्ये कोणत्या गटांची मोठी आघाडी झाली आहे?
बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी एकत्र आली आहे.

Q4: भाजपविरोधी गटांना अडचण काय आली?
पक्षाच्या चिन्हाच्या आग्रहामुळे व एकवाक्यतेचा अभावामुळे एकत्रित प्रयत्न अपयशी ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com