Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

Hemant Rasane : 'जनतेच्या मनातील आमदार रवींद्र धंगेकर', कट्टर विरोधक आमदार हेमंत रासनेंनी एका वाक्यात विषय संपवला!

Mahayuti Politics Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar : भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांना पक्षात घेण्याच्या विचार केला असता तर मी त्या विरोधात भांडलो असतो. मात्र महायुतीतील प्रत्येक पक्षाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे स्वातंत्र्य आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Roshan More

Mahayuti Politics : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते नुकताच प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावर भाजपमधून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. रवींद्र धंगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या समर्थकांकडून 'जनतेच्या मनातील आमदार', असा मथळा असलेला धंगेकरांचा भव्य बॅनर लावण्यात आला होता.

धंगेकरांच्या या बॅनर विषयी कसब्याचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'या अशा छोट्या विषयांवर मी बोलत नाही.' रासने यांनी अवघ्या एका वाक्यात धंगेकरांचा विषय टाळला. त्यामुळे धंगेकर जरी महायुतीमध्ये आले असले तरी कसबा मतदारसंघात त्यांना भाजपच्या विरोधाचा सामान करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

'कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय. माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीससाहेब आहेत. महायुतीमध्ये कायमध्ये काय करायचं हे ठरवण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसाहेबांना आहे. ते ठरतील ते आम्ही करणार.', असे देखील रासने (Hemant Rasane) यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट काळाच्या ओघांमध्ये बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. राज्यामध्ये महायुतीचे तीन पक्षांचं आमचं सरकार आहे. जर भाजपच्या (BJP) नेत्यांनी धंगेकरांना पक्षात घेण्याच्या विचार केला असता तर मी त्या विरोधात भांडलो असतो. मात्र महायुतीतील प्रत्येक पक्षाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे स्वातंत्र्य आहे.

धंगेकर-रासने कट्टर विरोधक?

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात हेमंत रासने हे भाजपचे उमेदवार होते. तेव्हा दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व दिसून आले होते. धंगेकरांनी पोटनिवडणुकीत रासनेंचा पराभव केला होता. तर,2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पराभवाचा परतफेड करत हेमंत रासने यांनी धंगेकरांवर दणदणीत विजय मिळवला होता. आत्ता धंगेकरांच्या समर्थकांनी 'जनतेच्या मनातील आमदार' असा बॅनर लावत रासने यांना डिवचल्याचे मानले जात आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT