Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर हिट अॅण्ड रन (Pune Hit And Run Case) प्रकरणात राजकीय आरोपांच्या फैरी सुरू आहेत. या अपघाताच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे उट्टे काढण्यात गुंतलेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधत 100 कोटी रुपयांच्या वसुलीची भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आठवण करून दिली. थोडी तरी लाज वाटू द्या, असे म्हणत सत्तेत असताना आताच्या विरोधकांनी केलेल्या प्रतापांना उजाळा देत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. 'देवेंद्रजी काही दिवसांपूर्वी तु्म्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील... आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडीखाली चिरडली गेली. असे असताना तुमच्या व्यवस्थेने जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले. जामीन करून दिला. देवेंद्रजी आता तु्म्ही सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?', असा प्रश्न अनिल देशमुख यांनी ट्विटवर पोस्ट करत उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. तसेच विरोधक कल्याणीनगर अपघात प्रकरणावर करत असलेल्या आरोपांचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मागणाऱ्यांचा समाचार घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार (Sharad Pawar)पक्षाचे आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव घेता निशाणा साधला आहे. अहो, थोडी तर लाज वाटू द्या. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरी बसून राहिले नाहीत. थेट पुणे आयुक्तालयात गेले. घटनेवर कारवाईला गती दिल्याची आठवण राम कदमांनी करून दिली. BJP MLA Ram Kadam's reply to Anil Deshmukh in Kalyaninagar hit and run case in Pune
पुणे (Pune) येथील कल्याणीनगरमधील अपघाताचा खटल्यातील आरोपीविरोधात प्रौढ आरोपी म्हणून खटला चालणार असल्याचे सांगून विरोधकांना राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे राम कदम यांनी म्हटले. यावेळी त्यांनी 100 कोटी रुपयांची वसुल करायला केवळ एकच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या राज्याला लाभला. ते कोण हे आम्ही सांगण्याची गरज नाही, असे म्हणून उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना टोला लगावला.
तसेच, एका धनदांडग्या बिल्डर आरोपीला पिकनिकसाठी पुण्यात जायला कोविड काळात पोलिस ताफा कुणी दिला, याची आठवण ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढचे काही बोलण्याची हिंमतच होणार नाही, आता बसली की नाही दातखिळी!, असे म्हणत आमदार राम कदम यांनी विरोधकांना ट्विटवर पोस्ट शेअर करत डिवचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.