Pankaja Munde On Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीनंतर भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक दिवसांच्या धावपळीतून घरी परतल्याचं सांगितलं. शिवाय त्यांनी यावेळी निवडणुकीच्या काळातील सर्व परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तर लढाई विचारांची असावी, कोणाचाही कायमस्वरुपी तिरस्कार वाटू नये अशा विचारांमध्ये आपली जडण घडण झाली असल्याचंही त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. निवडणूक पार पडली, मात्र अद्याप धाकधूक सुरु आहे. अनेक दिवसांनी घरी आले, प्रकृती खालावली आहे. कारण सलग 65 ते 70 दिवस अथक परिश्रम चालू आहेत. निवडणुकीच्या (Election) काळात खूप धावपळ झाली या सगळ्यातून आता विसावा मिळाला आहे. निवडणुकीचा निकाल 4 जूनला आहे. निकाल जे लागेल ते लागेल, लोकांनी सकारात्मकतेने साथ दिली, निर्भीडता ही निष्क्रीयतेवर भारी ठरते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मोठा संघर्ष मला दिला, पण त्याला पेलण्याची शक्तीही देवाने दिली आहे. पंकजा मुंडेंची सहज निवडणूक आहे म्हणता म्हणता वेगळा रंग घेतला. राज्यातही असेच काहीसे चित्र दिसले. लढाई विचारांची असावी, कोणाचाही कायमस्वरुपी तिरस्कार वाटू नये अशा विचारात माझी जडण घडण झाली आहे.
सत्तेच्या पदावर काम करतांना या गोष्टीचे पथ्य पाळले. मंत्री म्हणून काम करतांना कोणावर अन्याय केला नाही, याचं समाधान वाटतं. द्वेषविरहीत राजकारण करणं सोपं नाही, मुद्यांना धरुन राजकारण करायला हवं. एक मिशन असावं, उद्देश असावं, असं राजकारण करावं हे शिवधनुष्य पेलण्याचं काम मी करते, हे केवळ तुमच्या प्रेमापोटी. तुमचे आशिर्वाद नेहमीच सोबत ठेवा, असं आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.