Dhangekar on Porsche Accident : देवेंद्रजी, पुणेकरांना दिलासा द्या, पब संस्कृती संपवा!

Pune Porsche Accident News : पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे. याबाबत निर्णय जाहीर करून आपण पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama

Pune Car Accident : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अपघातातील आरोपींना आणि पब चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. आता त्यांनी पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे. याबाबत निर्णय जाहीर करून आपण पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. Pune Porsche Crash News

कल्याणीनगर (Kalyaninagar) मधील अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. यानिमित्ताने रवींद्र धंगेकर यांनी विविध मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. वेगवेगळ्या भागातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. अशा पुण्यात (Pune) पब संस्कृतीचे पेव वाढत आहे वडगाव शेरी, खराडी, कोरेगाव पार्क (Koregao Park) यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे पब संस्कृती वाढत आहे.

Ravindra Dhangekar
Pune Porsche Accident News : पब चालविणे गंमत आहे का? न्यायालयाचे खडेबोल; नेमकं काय घडलं?

मध्यरात्री उशिरापर्यंत हे पब सुरू राहत आहेत. या भागातील नागरिकांनी अनेकदा यापूर्वी कारवाई व्हावी, अशी मागणी केली. विनंती केली. पण हे बेकायदेशीरपणे थाटामाटात सुरू आहेत. यांच्यामुळे अल्पवयीन मुलांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे शहरातील पब संस्कृती संपली पाहिजे, अशी मागणी मी पुणेकरांच्या वतीने गृहमंत्र्यांकडे (Devendra Fadnavis) करतो असे धंगेकर म्हणाले. Pune Hit And Run Case News in Marathi

कल्याणीनगर (Kalyani Nagar) येथे अपघात घडल्यानंतर या प्रकरणातील दोषी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणा मोठ्या वेगाने कामाला लागली. पोलिसांनी जी कलमे लावणे आवश्यक होती ती लावली नाहीत. उलट आरोपीला लवकर सोडवता यावे यासाठी रेड कार्पेट अंथरले गेले. त्यामुळे संशयाची सुई तपास अधिकाऱ्याकडे जाते. या प्रकरणात येरवडा पोलिस स्टेशनमध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झालेला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच तपास अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिक अगरवाल (Agraval) यांच्या व्यावसायिक कामात देखील अनियमितता आहे. नियमावलीला फाटा देऊन त्यांनी कामे केली आहेत. याची गृहखात्याने चौकशी करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.

Ravindra Dhangekar
Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com