BJP leader Sarvesh Mehendale’s statement comparing Pune’s Kondhwa area to Pakistan has ignited political controversy and criticism. sarkarnama
पुणे

Pune News : भाजप पदाधिकाऱ्यामुळे पुण्यात पेटला वाद, काँग्रेसही आक्रमक, कोंढव्याची तुलना पाकिस्तानशी...

Controversial Remark Kondhwa Pakistan : भाजप पदाधिकारी सातत्याने कोंढवा भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगत काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील कोंढवा परिसराबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या पदाधिकाऱ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. तर, काँग्रेसने देखील भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी असलेले सर्वेश मेहंदळे यांनी कोंढवा परिसराची तुलना पाकिस्तानमधील 'कराची'शी केली. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी सर्वेश मेहंदळेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आयुक्तांनीही याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

भाजप युवा मोर्चाचा शहर खजिनदार सर्वेश मेहंदळे याने एका व्हिडिओमध्ये कोंढवा भागाचा उल्लेख 'पाकिस्तानचे कराची' असा केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने कोंढव्यातील एक परिसरामधील रुग्णालय आणि त्या रुग्णालया बाहेरील दुरावस्थेबाबत माहिती दिली होती.

मात्र ही माहिती देताना त्यांनी त्या भागाचा उल्लेख पाकिस्तान आणि कराची असा केला होता. हे वक्तव्य समोर येताच परिसरात तीव्र पडसाद उमटले. संतप्त कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलिस स्टेशनबाहेर निदर्शने करत संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्वत:हून दखल घेत मेहंदळे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने अपमान करणे नुसार एफआयआर दाखल केला आहे.

ही विकृत मानसिकता, काँग्रेस आक्रमक

या प्रकारावर काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "भाजप पदाधिकारी सातत्याने कोंढवा भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती-धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करून वेगळे राष्ट्र निर्माण करण्याची यांची सुप्त इच्छा दिसते आहे का? अशा विकृत मानसिकतेच्या लोकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी," अशी मागणी जगताप यांनी केली आहे. तसेच, हे प्रकार न थांबल्यास जनताच अशा लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलीस आयुक्तांची भूमिका

पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT