Pune News: बालभारती-पौडफाटा रस्त्यावरचं 'विघ्न' सरणार, वाहतूक कोंडी फुटणार? पुणे महापालिकेची मोठ्या निर्णयाला मंजुरी

PMC News: पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बालभारती ते पौडफाटा असा 30 मीटर रुंदीचा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. मात्र, हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याला कडाडून विरोध केला होता.
 Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बालभारती-पौडफाटा या बहुचर्चित रस्त्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. या प्रकल्पासाठी अनिवार्य असलेले पर्यावरणीय मंजुरी प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे रखडलेल्या या प्रकल्पाला आता वेग मिळण्याची चिन्हे आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बालभारती ते पौडफाटा असा 30 मीटर रुंदीचा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. मात्र, हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याला कडाडून विरोध केला होता.

त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. तसेच राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन समितीने या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.

सल्लागारावर कोट्यवधींची उधळण

पर्यावरणीय दाखला मिळवणे ही एक तांत्रिक आणि किचकट प्रक्रिया आहे. यासाठी महापालिकेला तज्ज्ञ सल्लागाराची गरज होती. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे.

 Pune Municipal Corporation
NCP News: विधान परिषदेला उमेदवारी नाकारली, राष्ट्रवादीत उडाला नाराजीचा पहिला मोठा भडका; एकाचवेळी 90 जणांचे तडकाफडकी राजीनामे

सुरवातीला या कामासाठी प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढावी लागली होती. अखेर 'आदित्य एन्व्हायरोमेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.' या एकमेव पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. या सल्लागार नियुक्तीसाठी सुमारे 1 कोटी 28 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेने अर्थसंकल्पात यासाठी 2 कोटींची तरतूद केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरणीय मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून हा रस्ता मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

 Pune Municipal Corporation
Maharashtra Police Transfer: मोठी बातमी: राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; एकाचवेळी 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? वाचा...

आता नियुक्त केलेला सल्लागार या प्रकल्पाचा पर्यावरणीय आराखडा तयार करेल. हा अहवाल राज्य पर्यावरण समितीकडे सादर केला जाईल. त्यानंतरच या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होणार की नाही, याचा फैसला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com