Sharad Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Mahayuti Government: फडणवीस सरकारनं एकाच दिवशी काढलेल्या 2 'जीआर'मुळे पेटला नवा वाद, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतला आक्षेप

Maharashtra Politics: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने नुकत्याच जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयांवरून नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने नुकत्याच जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयांवरून नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनचरित्रावर आधारित "युगप्रवर्तक-डॉ. हेडगेवार" या नाटकाच्या आयोजनासाठी तब्बल 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पुरंदर येथील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

निधी वाटपातील या प्रचंड तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महायुती सरकारवर टीका केला असून, हेडगेवारांसाठी मंजूर केलेला 45 लाखांचा निधी ताबडतोब रद्द करण्याची मागणी केली आहे.

शासकीय 'जीआर'मधील अधिकृत आकडेवारी

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 2 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार" नाटक या डॉ. हेडगेवारांचे जीवनचरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशिम या सहा ठिकाणी प्रत्येकी 7,50,000 रुपये प्रति प्रयोग याप्रमाणे एकूण 45,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे याच तारखेला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यावर पुरंदर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लाख निधी देण्यात आला आहे. या निधी वाटपावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

विकास लवांडे म्हणाले, महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नेहमी असे म्हणणे असते की, 'राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते'. परंतु, सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन या देशात स्वातंत्र्याचा नारा महात्मा गांधींनी दिला. डॉ. हेडगेवार यांनी या देशामध्ये विषारी विचार पेरण्याशिवाय काहीही वेगळे केले नाही. मग डॉ. हेडगेवार हे 'युगप्रवर्तक' कधीपासून झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांना संपूर्ण जग युगप्रवर्तक मानते." असं लवांडे म्हणाले.

निधी ताबडतोब रद्द करण्याची मागणी

लवांडे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्यावरील जयंती उत्सवाला सरकार अवघे 10 लाख रुपये जाहीर करते, मात्र हेडगेवारांच्या नाटकासाठी 45 लाख रुपयांची भरघोस तजवीज करते. महायुती सरकारचा निधीतला हा उघड भेदभाव अत्यंत चुकीचा असून तो ताबडतोब थांबवला पाहिजे. हेडगेवार यांच्या नाटकासाठी मंजूर करण्यात आलेला 45 लाखांचा निधी सरकारने तातडीने रद्द करावा, मागणी लवांडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT