Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

कोल्हापुरात भाजपाचा विजय नक्की; चंद्रकांतदादांचा विश्‍वास !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो हा इतिहास आहे. त्यामुळे आज झालेले मतदान पाहता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी विजयाबद्दल विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘ या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदानात निवडणुकीचा टक्का वाढला की त्याचा फायदा भाजपाला होतो हा इतिहास आहे. त्यामुळे आमचा विजय अधिक मताधिक्क्याने होईल. कोल्हापुरातील जनता सूज्ञ आहे. मतदानाच्या रूपाने ती भाजपाच्या पाठीमागे उभी राहील.’’

निवडणुकीच्या या काळात प्रशासनावर दबाव होता. मात्र, एका मर्यादेपिलकडे जाऊन एकतर्फी कारभार प्रशासनाने होऊ दिला नाही. काही प्रमाणात ‘बॅलन्स’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडपाला भगवा रंग असू नये, अशा काही अटी घातल्या छत्रपतींच्या कोल्हापुरात भगव्याला विरोध करणे योग्य नाही. नियम असावेत. मात्र, त्याला काही मर्यादा असली पाहिजे, याचे भान ठेवण्याची गरज आहे, असे पाटील यांनी सांगितले.

किरीट सोमय्यांच्या विषयात कारवाई करताना नियमांचे पालन व्हायला हवे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, मात्र, सोमय्यांच्या विषयात सत्याला न्याय नक्की मिळेल. हा विषय न्यायालयात असल्याचे मी फार बोलणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबतही जेलमध्ये जाण्याच्या गोष्टी खासदार संजय राऊत करीत होते. मात्र, न्यायालयाने दरेकर यांना दिलासा दिला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT