खासदारकी संपल्यानंतर माझी दिशा वेगळी असणार; संभाजीराजेंची गुगली

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी न्यू पॅलेस परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले.
 Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama

कोल्हापूर : मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत माझ्या खासदारकीची मुदत आहे. त्यानंतर माझी दिशा वेगळी असणार, अशी गुगली खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज टाकली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी खासदार संभाजीराजे यांनी न्यू पॅलेस परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. माझी सामाजिक कामे सुरु आहेत. माझ्या कामाचा कोण कसा अर्थ काढेल हे मला माहिती नाही. कोणी काय बोलावे, हे मी काय सांगू शकणार नाही. मी माझ्या पध्दतीने प्रामाणिक काम करत असतो. काम करताना मी मागच्या पुढच्याचा विचार करत नाही. माझी पुढची दिशा 3 मे नंतर वेगळी असणार आहे. काय असेल यासाठी आपल्याला थोडे थांबावे लागेल, असेही संभाजीराजे म्हणाले.

 Sambhaji Raje Chhatrapati
कोणाला मतदान करावे, यासाठी मला अर्धा मिनिट लागला : संभाजीराजे पडले बुचकळ्यात

त्याच बरोबर मतदान करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. सर्वांनी मतदान करावे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आज बराच विचार करुन मी मतदान केले, असेही ते म्हणाले. मतदान कोणाला करावे यासाठी मला 30 सेकंद लागली. मात्र, मतदान करण्यात आनंद वाटला. व्यक्ति स्वातंत्र्य आहे. किती माणूस मोठा असला तरीही विचारपूर्वक मतदान केले जाते. तसा मीही विचार केला, असेही त्यांनी सांगितले होते.

 Sambhaji Raje Chhatrapati
मी घरी येणार होतो म्हणत चंद्रकांतदादांनी दिली ऋतुराज पाटलांना 'जादू की झप्पी'

दरम्यान, 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayshree Jadhav) रिंगणात आहेत, तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणूक असली तरीही दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com