Kundmala Bridge Collapses News : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्याजवळी पूल वाहून गेला. या पूलावर तब्बल 30 ते 35 पर्यटक उभे असल्याची माहिती आहे. यातील 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे. आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वर्षा विहारासाठी पुणे परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक कुंडमळा परिसरात जात असतात. मागील काही दिवासांपासून होत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदीचे पाणी देखील वाढले होते. त्यामध्ये विक एंडसाधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गेले होते.
नदीवर असलेला पूल छोटा आहे.हा पूल जुना असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र, त्यावर 20 ते 25 पर्यटक उभे होते. आपल्या दुचाकी देखील पूलावर पर्यटकांनी नेत्या होत्या. त्यामुळे पूल कमकुवत होता. येवढ्या पर्यटकांचा भार सहन न झाल्याने पूल कोसळ्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
पूल कोसळल्याने एकच खळबळ उडाली. त्यावेळी पर्यटकांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक धावले. त्यांनी जखमींना नदीतून बाहेर काढले. मात्र, काही पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे. नेमके किती पर्यटक वाहून गेले याची निश्चित आकडा समजू शकला नाही.
पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यातील बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ कुंडमळा हे छोटेशेगाव आहे. येथील कुंडमळा धबधबा प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा धबधबा पाहाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.