Bharat Gogawale News : छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेनेत येण्यापासून रश्मी ठाकरे यांनी अडवल्याचा गंभीर आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. रश्मी ठाकरे यांचा पडद्यामागून हस्तक्षेप असायचा असे देखील त्यांना सांगितले. या त्यांच्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असताना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचे उदाहरण दिले.
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वहिनींनी (लता शिंदे) कधी हस्तक्षेप केला नाही. मागील तीन वर्ष तुम्ही पाहाताय त्यांच्या विषयी चर्चा तरी आहे का? आमच्या वहिनींना राजकारणात कुठे पाहिलेही नसेल. ', असे भरत गोगावले म्हणाले.
श्रीशक्तीचा मी आदर करतो पण त्यावेळी श्रीशक्तीने ज्या चांगल्या गोष्टी सांगयला हव्या होत्या त्या सांगितल्या नाहीत. नारायण राणेसाहेब शिवसेनेत येणार होते पण माशी कुठे शिंगली ते माहीत नाही, असे म्हणत निर्णयप्रक्रियेत पडद्यामागून रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप होता, असे भरत गोगावले यांनी म्हटले.
'शिवसेना एकसंध असताना ठाकरे बंधु एकत्र यावे, असे आम्हाला वाटत होते. उद्धव ठाकरेंना स्वतः राज ठाकरे हे लिलावती हाॅस्पिटलमधून घेऊन आले होते. तेव्हा वाटत होते की दोन्ही बंधु एकत्र येतील. पण त्यांना एकत्र येऊ दिले नाही.', असा आरोपही गोगावले यांनी केला.
भरत गोगावले हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यावर बोलताना गोगावले म्हणाले, त्यांनी माझ्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करून दाखवावा मी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देईल. आरोप सिद्ध झाले नाही तर परांजपेंनी तोंडाला काळे फासू घ्यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.