Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळमधील पती-पत्नी अन् दोन वर्षांच्या चिमुरडीचा अंत...

Kedarnath Helicopter Accident : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. ज्यात पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kedarnath Helicopter Crash Yavatmal Jaiswal family devendra fadnavis
Kedarnath Helicopter Crash Yavatmal Jaiswal family devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Kedarnath Helicopter Crash News : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच आता केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मृत सात जणांमध्ये राज्यातील तिघांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील असून ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील आहेत. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. (Maharashtra family Death in Kedarnath Helicopter Crash)

अहमदाबादमधील विमान अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या अपघातात विमानातील 241 जणांसह येथे विमान कोसळले येथील 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अख्खा देश सध्या दुखात असतानाच दुसरीही दु:खद बातमी येऊन थडकलीय. उत्तराखंडमधील केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. ज्यात महाराष्ट्रातील यवतमाळ वणीमधील जयस्वाल कुटुंबाचा अंत झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचं होतं.

प्राथमिक माहितीनुसार ही दुर्दैवी घटना खराब हवामानामुळे गरुडचट्टीजवळील घडली. देहरादूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले होते. ते जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसे ते गरुडचट्टीजवळ आढळले. मोठ्या प्रमाणामध्ये धूर येत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले. या अपघाताची माहिती मिळताच NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर यातील तिघे महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये राहणारे जयस्वाल कुटुंबातील असल्याते समोर आले आहे.

Kedarnath Helicopter Crash Yavatmal Jaiswal family devendra fadnavis
Kedarnath Helicopter Crash : अहमदाबादमधील विमान अपघात ताजा असतानाच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

या अपघातात राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. पण सुदैवाने या कुटुंबातील विवान नावाचा मुलगा आजी-आजोबांकडे असल्याने बचावला आहे. पण एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वणी शहरावर शोककळा पसरली आहे.

Kedarnath Helicopter Crash Yavatmal Jaiswal family devendra fadnavis
PM Modi in Kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान केदारनाथ दौऱ्याचे हे फोटो पाहिले का?

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

केदारनाथमध्ये झालेल्या या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी, आज सकाळी केदारनाथहून गुप्तकाशीला जाताना उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ज्यात प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे खूप दुःख झाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता. मी शोकाकुल असून कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com