anil deshmukh sarkarnama
पुणे

Video Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; CBIचा धक्कादायक अहवाल

CBI submits report against Anil Deshmukh Pune court Maratha Vidya Prasarak Sanstha case: आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी केली होती.

Sudesh Mitkar

Pune News: मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामुळे देशमुख यांना मंत्रिपद गमवावे लागले. त्यांना 14 महिने तुरुंगात राहावे लागले होते.

आता अनिल देशमुखांच्या अडचणीत पून्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. पुणे मोक्का कोर्टात सीबीआयने धक्कादायक अहवाल सादर केला आहे. हा अहवाल देशमुखांची डोकेदुखी वाढवू शकतो.

भारतीय जनता पक्षाचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेतील गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती.

संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, नीलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे मोक्का कोर्टात सीबीआयने अहवाल दिला आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच हे प्रकरण तापलं होत. याप्रकरणात तत्कालीन एसपीली देखमुखांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढेंची सीबीआयकडे याबाबत कबुली दिली आहे. प्रवीण मुंढेंचं म्हणणं आहे की याप्रकरणात अनिल देशमुख दबाव टाकत होते. जळगावचे तत्कालीन SP प्रवीण मुंढे यांची cbi ला माहिती दिली आहे. Cbi ने न्यायालयात ही माहिती सादर केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT