Anil Deshmukh: विदर्भात देशमुख पिता-पुत्र विधानसभेच्या मैदानात ; कोण कुठून लढणार?

Anil Deshmukh Claim on Kotal Assembly Constituency: शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काटोल हा एकमेव मतदारसंघ नाही. हिंगणा या मतदारसंघाशिवाय आणखी एक तसेच नागपूर शहरातील एक मतदारसंघ मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत.
salil deshmukh Hingana Assembly Constituency
salil deshmukh Hingana Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दावा केला आहे. उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट सुद्धा घेतली आहेत. त्यावर अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अनिल देशमुख म्हणाले, "आम्ही एकत्र बसून कोणी कुठून लढायचे हे ठरवणार आहोत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काटोल हा एकमेव मतदारसंघ नाही.नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या मतदारसंघाशिवाय आणखी एक तसेच नागपूर शहरातील एक मतदारसंघ मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत," हे बघता अनिल देशमुख आणि सलील देशमुख दोघेही लढतील, मात्र वेगवेगळ्या मतदारसंघातून अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यात कोणी किती व कुठल्या जागा लढायच्या याच निर्णय होणार आहे. जो सक्षम उमेदवार असले त्याला आम्ही उमेदवारी देऊ. लोकसभेच्या निवडणुकीत हाच फॉर्म्युला महाविकास आघाडीने ठरवला होता. तो चांगलाच यशस्वी ठरला आहे. महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. आम्ही विधानसभेच्या १८० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.

salil deshmukh Hingana Assembly Constituency
Manikrao Kokate: निधीवरुन मंत्र्यांचे नखरे, आता तरी सुधरा; नाहीतर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल!

नागपूर शहरातील तसेच नागपूर ग्रामीणमधील कुठला मतदारसंघ मागायचा याचा निर्णय आपसात ठरवून घेऊ. मात्र एक निश्चित महाराष्ट्रात चमत्कार होईल आणि महाविकास आघाडीचे सरकार येईल असेही देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रासमोर शेपूट टाकू नये. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. सर्वच नेत्यांनी महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी आग्रह करावा. बिहार आणि आंध्रला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. कदाचित ती भाजपची मजबुरी असावी. मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या मनात प्रचंड चीड असल्याचे देशमुखांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com