Pune police FIR teachers Census Duty 2026  Sarkarnama
पुणे

Census Duty FIR Pune: जनगणना प्रशिक्षणाला दांडी मारणं महागात! मुख्याध्यापकांसह 8 शिक्षकांवर गुन्हा

Pune police FIR teachers Census Duty: जनगणनेच्या पूर्वतयारीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी संपूर्ण १६ प्रभागांमध्ये २८४ प्रगणक आणि ३६ सुपरवायझर अशा एकूण ३२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : शासकीय कामात कसूर आणि आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या आगामी जनगणना 2027 च्या मोहिमेसाठी आयोजित प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याप्रकरणी फुरसुंगी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देण्यात आली असून, या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देशभरामध्ये सध्या जनगणनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जनगणनेची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली असून यासाठी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना या जनगणनेबाबत प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर हडपसर-फुरसुंगी नगरपरिषद हद्दीत जनगणनेच्या पूर्वतयारीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी संपूर्ण १६ प्रभागांमध्ये २८४ प्रगणक आणि ३६ सुपरवायझर अशा एकूण ३२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत फुरसुंगी नगरपरिषद कार्यालयात विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

वारंवार आदेश देऊनही 'दांडी'

या प्रशिक्षणासाठी फुरसुंगी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना आणि क्रीडा शिक्षकांना उपस्थित राहण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, या आठ जणांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली. वारंवार सूचना देऊनही हे शिक्षक हजर राहिले नाहीत. अखेर, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेच्या कर अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या कलमान्वये गुन्हा दाखल

संबंधित शिक्षक जाणीवपूर्वक शासकीय आदेशांचे उल्लंघन करून जनगणनेच्या राष्ट्रीय कामात अटकाव निर्माण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १७४अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात प्रशासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फुरसुंगी पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT