Nasrapur girl case: नसरापूर अत्याचार प्रकरण! पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड; चिमुरडीच्या तोंडात आढळला सॉक्स

Nasrapur minor assault murder case News Update: मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने जतन करण्यात आले असून, ते पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
Nasrapur minor assault murder case News Update
Nasrapur minor assault murder case News Updatesarkarnama
Published on
Updated on

Nasrapur Crime News: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. या चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपीने तिच्यावर किती क्रूरपण अत्याचार करुन हत्या केली, हे स्पष्ट झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमांचे निशाण आढळले आहेत. विशेषतः छातीवर गंभीर स्वरूपाचे वळ दिसून आले आहेत.

तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने जतन करण्यात आले असून, ते पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

Nasrapur minor assault murder case News Update
Atul Save News: मंत्री अतुल सावे यांच्या माजी ओएसडीवर गुन्हा; पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, मुलालाही बॅटने मारहाण?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ पद्धतीने करण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेचे तज्ज्ञही उपस्थित होते. दरम्यान, आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी त्याची मानसिक व शारीरिक ‘सक्षमता चाचणी’ देखील पूर्ण केली आहे.

Nasrapur minor assault murder case News Update
Thalapathy Vijay News: ‘थलपती’ CM होणार? भाजप खासदार हेमा मालिनी यांचा मोठा दावा

१ मे रोजी घडलेल्या या घटनेत एका वृद्ध व्यक्तीने घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला फूस लावून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Nasrapur minor assault murder case News Update
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी आपल्याच खासदाराला दिला दणका; परभणीत समर्थक जिल्हाप्रमुखाला हटवले!

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असून, सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्याची तयारी केली जात आहे, या खटला फास्ट टॅकवर चालविण्यात जावा, अशी मागणी होत आहे.पोलिसांकडून या प्रकरणात तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून न्यायालयात भक्कम केस उभा करता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com