Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil : 'स्वच्छतेची अनुभूती का घ्यावी', चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण!

Chandrakant Patil News : चंद्रकांत दादांनी कुठे केली स्वच्छता?

Chaitanya Machale

Pune News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. नाशिक येथील काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली. तत्पूर्वी काळाराम मंदिर परिसराची स्वच्छता मोदी यांनी केली. यावर समाज माध्यमांवर जोरदार टीकादेखील झाली. त्यानंतर मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवी मंदिरात जाऊन साफसफाई केली. स्वच्छतेचा हाच वसा पुण्यातही घेण्यात आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मृत्युंजय मंदिरात जाऊन साफसफाई केली.

अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार आहे. अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचे हे मंदिर उभारण्यात आले असून, या दिवशी देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. अयोध्येत साजरा होणाऱ्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरातील मंदिरांची तसेच पूजास्थळांची स्वच्छता करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर विविध शहरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक मंदिरांना भेटी देऊन तेथे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मुंबई येथील मुंबादेवी मंदिरात जाऊन साफसफाई केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांच्यासह भाजप प्रमुख पदाधिकारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. मंदिर स्वच्छतेचा हाच नारा आता पुण्यातही देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantdada Patil) यांनी कोथरूड येथील मृत्युंजय मंदिराला भेट देऊन परिसराची साफसफाई केली. संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, अमोल डांगे, माजी नगरसेवक जयंत भावे यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

'मनाच्या शुद्धीप्रमाणे पूजास्थळांची स्वच्छता हीदेखील पवित्र आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरीदेखील आपल्या पुजास्थळी जाऊन स्वच्छतेची अनुभूती घ्यावी', असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. मठ आणि मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. आपल्या मनाच्या शुद्धीसाठी आपण देवदर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताहीदेखील तितकीच पवित्र असल्याचे पाटील म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT