Ayodhya Ram Mandir : 'नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामांचा वनवास संपवला, शंकराचार्यांनी...' सदाभाऊ खोत म्हणाले...

Sadabhau Khot : शंकराचार्य यांनी धार्मिकता, धर्म, संस्कृती याच्यावर मार्गदर्शन करावे. इतर कोणत्याही वादात पडू नये.
Sadabhau Khot
Sadabhau Khot sarkarnama
Published on
Updated on

Pune : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. देशभर हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारीदेखील करण्यात येत आहे. मात्र, चारही शंकराचार्य या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे शंकराचार्यांवर भाजपच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. भाजपनेत्यांपाठोपाठ शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील शंकराचार्यांवर टीका करीत राम मंदिराचे श्रेय नरेंद्र मोदींचेच असल्याचे म्हटले आहे.

Sadabhau Khot
Maratha Reservation : 55 लाख कुणबी नोंदी सापडल्या मग दाखला का नाही? मनोज जरांगेंनी...

प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपवण्याचे काम खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले आहे. प्रभू राम वनवास संपवून आले होते. तरी काही लोकांनी त्यांना अजूनपर्यंत वनवासात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु त्यांना वनवासाबाहेर काढण्याचे काम देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. या सर्व प्रकारामुळे काही लोकांचा पोटशूळ उठला आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्या काँग्रेसनेत्यांचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी धर्मपीठाचे शंकराचार्य यांनी बहिष्कार घातल्याचे समजले आहे. शंकराचार्य यांनी धार्मिकता, धर्म, संस्कृती याच्यावर मार्गदर्शन करावे. इतर कोणत्याही वादात पडू नये. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहत आहे ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. ते कोणीही विसरता कामा नये, असा टोलादेखील खोत यांनी लगावला.

रामराज्य परत आणले

शंकराचार्य आणि काँग्रेसनेत्यांना टार्गेट करताना श्रीराम हे क्षत्रिय होते. ते लढाऊ होते. लढाऊ बाणा दाखवूनच नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमीवर भव्यदिव्य असे श्रीरामाचे मंदिर उभारले आहे. हे मंदिर उभारून आम्ही रामराज्य आणत आहोत, असा संदेशच त्यांनी देशातील जनतेला दिलेला आहे, असे खोत म्हणाले.

(Edited By Roshan More)

R...

Sadabhau Khot
NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाची 'दुरी क्या कहलाती हैं'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com