Pune : बाणेरमधील 'ऋतुपर्ण' सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात. विशेषत: राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा निवास या सोसायटीत आहे. परिणामी, या सोसायटीत नेहमीच व्हीआयपींचा कायमच वावर असतो. मात्र, शुक्रवारी (दि.९) दुपारी अचानक काही चारचाकी वाहनांमधून 'सीबीआय'चे अधिकारी दाखल झाले. त्यांनी सोसायटीच्या कोणत्याच यंत्रणेला न जुमानता पुणे महसूल विभागातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या घराचा ताबा घेतला. अचानक पडलेल्या या धाडीमुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसह मॅनेजरचीही चांगलीच भंबेरी उडाली.
सीबीआयच्या या छाप्याची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी रामोड यांच्या निवासस्थानाकडे तात्काळ धाव घेतली. सोसायटीत दाखल झाल्यानंतर मॅनेजरसोबत त्यांनी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सोसायटीची परवानगी घेतली का ? ते खरे की आहेत खोटे यांसारखे प्रश्न पोलिसांकडून सोसायटीच्या मॅनेजरला विचारण्यात आले.
यावेळी पोलिसांचे प्रश्नांमुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि मॅनेजर यांची तारांबळ उडाली. मात्र, यानंतर मॅनेजरने सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद करवून दिला.यानंतर पोलिसांची हे सीबीआयचे पथकच असल्याची खातरजमा झाल्यावर तेथून माघारी परतले.
पुणे महसूल विभागातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड (Anil Ramod) यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयासह बाणेरमधील त्यांच्या ऋतुपर्ण सोसायटीतील घरावर सीबीआयने शुक्रवारी(दि.९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापे टाकले. यामुळे यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या सीबीआयच्या पथकाकडून चौकशीसह झाडाझडती सुरु आहे.
पुणे(Pune) महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या विधानभवनातील कार्यालयासह बाणेरमधील ऋतुपर्ण सोसायटीत ‘सीबीआय’चे सुमारे १२ ते १५ जणांचे पथक दाखल झाले. साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सीबीआयच्या पथकाची पहिली गाडी बाणेरमधील रामोड यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर १० मिनिटांनी दोन गाडया आल्या. एकूण १२ ते १५ जण या पथकात होते.
सीबीआयच्या छाप्यात मोठं घबाड हाती...
पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या बाणेरमधील ऋतूपूर्ण सोसायटीतील घरावर सीबीआय(CBI) पथक दाखल झाले. यावेळी सोसायटीच्या सुरक्षेला न जुमानता हे पथक थेट इमारतीच्या ‘सी’ विंगमधील चौथ्या मजल्यावर जात रामोड यांच्या घराचा ताबा घेतला. घराचा दरवाजा लावून घेत त्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी सीबीआयच्या पथकाच्या हाती मोठं घबाड लागल्याची चर्चा आहे. कारण छाप्यानंतर काहीच वेळात पोलिसांनी पैसे मोजण्याचे दोन मशिन्स तर मागवलेच शिवाय पैसे मोजण्यासाठी काही बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले.
पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या घरी सीबीआयने शुक्रवारी (दि.९) छापे टाकले. यावेळी त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता अटक केलेल्या अधिकाऱ्याची संपूर्ण चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांनी किती मालमत्ता जमा केली याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.