Shahajibapu Patil Challenge to Walse-Patil: शहाजीबापू आंबेगावात आले आणि विकासकामांवरुन थेट वळसे-पाटलांनांच चॅलेंज केलं !

Ambegaon Politics: शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर ३६ कोटी ७३ लाख रकमेच्या विकासकामांच्या उदघाटन करण्यात आले.
Shahajibapu Patil Challenge to Walse-Patil:
Shahajibapu Patil Challenge to Walse-Patil: Sarkarnama
Published on
Updated on

Shahajibapu Patil on Walse-Patil: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून व शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर ३६ कोटी ७३ लाख रकमेच्या विकासकामांच्या उदघाटन करण्यात आले. मंचर शहरात २६ कोटी रुपयांच्या निधीतून साकारत असलेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील हेदेखील उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात बारामती आणि आंबेगावच्या विकासाचं वैभवाचे दाखले दिले जातात. त्यातच सांगोल्याचे आमदार शहाजी बापुंनी (Shahajibapu Patil) आंबेगावात येऊन आंबेगावच्या तीस वर्षाच्या विकासाला आव्हान दिलं आहे. आंबेगावच्या तीस वर्षाच्या विकासाच्या निधीची बेरीज करा त्याच्या दुपट्टीनं सांगोल्यात विकास केल्याचा दावा शहाजीबापुंनी त्यांच्या स्टाईलने मांडत थेट माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांना आव्हानच दिलं आहे.

Shahajibapu Patil Challenge to Walse-Patil:
CBI Raid On Anil Ramod : अबब ! 'ऋतुपर्ण'वर पैशांचा पाऊस; पैसे मोजायला दीड डझन अधिकारी आणि दोन मशीन ?

चार वर्षे झाली मी निवडून येतोय. सांगोल्यातील चार वर्षांच्या निधीची आकडेवारी काढायची, मोजायची आणि बेरीज काढायची आणि आणि विकासाचा हिशोब लावायचा. गेल्या चार वर्षातील सांगोल्याच्या आकडेवारी दिलीप वळसे पाटलांच्या तीस वर्षांच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट नसतील तर ... ! असं म्हणत माझ्या सांगोल्याचा विकास दुपटीने झाला असल्याचा दावा शहाजीबापुनं आंबेगाव येथील जाहीर सभेत केला.तसेच जनतेने आम्हाला निवडून दिलं.चौदा कोटी जनतेने निवडून दिलेल्या २८८ मानकऱ्यामंध्ये आम्हाला बसवले. आमच्या गोरगरीब जनतेन बसवलं. (Pune Politics)

Shahajibapu Patil Challenge to Walse-Patil:
Pune Loksabha- Vidhansabha Election News: शिंदे-ठाकरे गटात अस्वस्थता; भाजप-राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याने सैनिक सैरभैर!

आढाळराव म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने मंचर शहरातील विकासकामांना बूस्टर डोस मिळाला आहे. विकासाला एक चांगली दिशा आणि गती मिळाली आहे. यातून जनतेला एक चांगला संदेश देण्याचं काम आपण केलं आहे. मंचर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच; परंतु भविष्य सुद्धा तितकच उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला एकजुटीने प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठीच्या माझ्या प्रत्येक प्रयत्नाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची साथ, सहकार्य निश्चित असणार आहे. मंचर नगरपरिषदेला शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, याची सुद्धा मंचरकरांना खात्री दिली.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com