Mumbai Pune Express highway Accident Sarkarnama
पुणे

Mumbai Pune Express highway Accident : लोणावळ्याजवळ केमिकल टँकरने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू

Accident News : केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन मोठा अपघात घडला.

सरकारनामा ब्यूरो

Lonavala : मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ केमिकल टँकर भरधाव वेगामुळे पलटी झाला आणि त्यानं पेट घेतला. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (दि.१३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटातील कुणे पुलावर भीषण अपघात घडला. केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला. नंतर त्या टँकरने पेट घेतला. याचदरम्यान,टॅंकर पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. या आगीत टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडलं आणि मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. (Mumbai Pune Express Highway Tanker Fire)

राज्य पोलीस दल, महामार्ग पोलीस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आल्यानंतर काहीवेळातच दुसरा मार्गही पूर्ववत करण्यात आला.

फडणवीस काय म्हणाले..?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकरला लागलेल्या आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणाले, "मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.

काय घडलं?

केमिकलची वाहतूक करणारा भरधाव वेगातील टँकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळं टँकर पलटी झाला. या अपघातात टँकरमधील केमिकल रस्त्यावर पसरले, खालील मार्गावरही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग(Fire) लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले आणि तेही या आगीत होरपळले. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

(Edited By DeepaK Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT