Baramati News : अखेर ठरलं…कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामती येणार; अहिल्यादेवी होळकर जयंती दणक्यात साजरी होणार

बारामतीमध्येही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जंगी स्वरूपात साजरी करण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानसह धनगर समाजाने जय्यत तयारी केली आहे.
Siddaramaiah
Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon-Baramati News (Pune) : कर्नाटकाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे, त्यासाठी धनगर समाज बांधवांनी केलेल्या प्रयत्नाला आज यश आले. बारामती येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. २६ जून) बारामतीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त येत असल्याचे निश्चित केले. याबाबतची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. (Karnataka Chief Minister Siddaramaiah will come to Baramati for Ahilya Devi Holkar Jayanti)

Siddaramaiah
Patole On Shivsena Advt : फडणवीसांचा एवढा अपमान शिंदे करतील, असं वाटलं नव्हतं; काँग्रेसनं उपमुख्यमंत्र्यांच्या जखमेवर मीठ चोळले

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना बारामतीत (Baramati) निमंत्रीत करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाली होती. संबंधित नेत्यांशी पवारांनी पत्रव्यवहारही केला होता. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी बारामतीला येण्याचे मान्य केले, असेही देवकाते यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बारामती दौरा महत्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Siddaramaiah
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती (Ahilya Devi Holkar Jayanti)) साजरी करण्यासाठी चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. सत्ताधारी नेतेमंडळींनी महत्वपूर्ण घोषणा करताना नगर जिल्ह्याला, तसेच बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. ही गोष्ट ताजी असतानाच बारामतीमध्येही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जंगी स्वरूपात साजरी करण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानसह धनगर समाजाने जय्यत तयारी केली आहे. (Baramati Ahilya Devi Holkar Jayanti)

Siddaramaiah
Rohit Pawar on Shiv Sena's Advt : फडणवीसांपेक्षा शिंदे जादा लोकप्रिय; रोहित पवार म्हणतात, ‘शिंदे गट स्वतःला....’

राष्ट्रवादीचे नेते विश्वास देवकाते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सुरवातीपासूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यासाठी थेट शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. त्याबाबत देवकाते म्हणाले की, भाजपला चारीमुंड्या चित करून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले सिद्धरामय्या हे धनगर समाजबांधव आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत बारामतीत अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी खुद्द पवारसाहेबांनी आम्हाला सहकार्य केले.

Siddaramaiah
Maharashtra Congress : नाना पटोले म्हणतात, ‘होय, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार; पण...’

महाराष्ट्रात धनगर समाज मोठा आहे. जयंतीच्या निमित्ताने २६ जून रोजी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शरद पवार यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे, बारामतीमध्ये ३१ वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार असल्याने धनगर समाज बांधवांमध्ये उत्साह आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com