Chetan Tupe, NCP, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Chetan Tupe In NCP Sharad Pawar Group : 'नॉट रिचेबल' असलेले चेतन तुपे पोहचले थेट वाय.बी.सेंटरला; पवारांच्या मेळाव्यात !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर दोन्ही गटाकडून आमदारांच्या जमवाजमवीसाठी मोठं दबावतंत्र सुरु आहे. याचवेळी आता दोन दिवस 'नॉट रिचेबल' असलेले हडपसरचे आमदार चेतन तुपे हे अजित पवार आणि शरद पवार गटात जाणार याविषयीचा सस्पेन्स चांगलाच वाढला होता. पण अखेर आमदार तुपे हे शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने आमदारांना व्हिप जारी केला होता. राज्यातले राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी सर्वांनाच या बैठकीला येण्याचं निमंत्रण करण्यात आलं होतं. या बैठकीत पक्षातील सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात येईल. तसंच अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना परतण्यासाठी आजच्या तारखेचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, आता कोण कुणाच्या बाजूने हे बऱ्यापैकी आता स्पष्ट झालं आहे.

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुणे जिल्ह्यातील भूमिका स्पष्ट नसलेले एकमेव आमदार चेतन तुपे(Chetan Tupe) होते. त्यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर आपण अजित पवार (Ajit Pawar) की शरद पवार यांपैकी कुणासोबत जाणार हे स्पष्ट केले नव्हते. तुपे हे 'नॉट रिचेबल' झाले होते. त्यामुळे लवकरच ते कुठल्या गटात असतील राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, बुधवारी (दि. ५ ) ते शरद पवार गटाच्या वायबी सेंटर येथील बैठकीला उपस्थित राहिले. यामुळे ते पवारांसोबत असल्याचं चित्र आता स्पष्ट झाले आहे

राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाने आपलाच मूळ पक्ष असल्याचे सांगत पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. फक्त हडपसरचे आमदार हे चेतन तुपे पवारांसोबत गेल्यामुळे मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बुधवारी बोलावली होती. ही बैठक वांद्य्रातील मॅट कॉलेजमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याचदिवशी शरद पवार यांच्याही समर्थक आमदारांच्या बैठकीचे आयोजन होते. शरद पवार वाय.बी. सेंटरमध्ये ही बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांकडे सध्यातरी आमदारांचं संख्याबळ जास्त असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT