Manoj Jarange Patil, CM Eknath Shinde sarkarnama
पुणे

Eknath Shinde : जरांगेंची लाखोंची सभा झालेल्या 'या' ठिकाणाहूनच मुख्यमंत्री शिंदे रणशिंग फुंकणार

Shivsena ShivSankalp Yatra : शिंदे शिवसेनेचे राज्यात महिनाभर ६ तारखेपासून शिवसंकल्प अभियान...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad: आगामी लोकसभा निवडणुकीचे जागावाटप फायनल झाले नसतानाही महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या परीने या निवडणुकीची तयारी सुरुही केली आहे. त्य़ासाठी शिंदे शिवसेना 6 तारखेपासून राज्यात महिनाभर शिवसंकल्प अभियान सुरु करत आहे. ते शिवसेनेचे खासदार असलेल्या आणि मागील वेळी निवडणूक लढविलेल्या मतदारसंघांसाठी असून त्याची सुरवात शिरुर लोकसभा मतदारसंघापासून होणार आहे.

या अभियानातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिरुरची सभा राजगुरुनगर (ता.खेड) येथे होणार आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांची 20 ऑक्टोबरला लाखोंची सभा झालेल्या खेड घाटाखालील मैदानातच शिंदेचीही सभा होणार आहे. त्यामुळे त्यावेळची गर्दी आणि 6 जानेवारीला होणारी गर्दी यांची तुलना निश्चित होणार आहे. दरम्यान,या जागेची मंगळवारी पाहणी करण्यात आली.

राज्याच्या युती सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार) म्हणजे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिरुरवर अगोदरच दावा ठोकला आहे.एवढेच नाही,तर त्यांनी तेथील विद्यमान खासदार आघाडातील शरद पवार राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठी ते शिरुरमधून खासदारकीची हॅटट्रिक केलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

तर, आता त्यांच्यासाठीच या आभियानाची सुरुवात शिरुरमधून मुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे आढळराव हे शिरुरमध्ये युतीचे उमेदवार असणार,पण शिंदे शिवसेनेचे की अजित पवार राष्ट्रवादीचे अशी चर्चा आता रंगली आहे.दुसरीकडे आढळराव यांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असली,तरी कुठल्या पक्षाकडून लढणार हे त्यांनी स्पष्ट केले नसल्याने शिरुरचा सस्पेन्स कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे पिंपरी-चिंचवड येथे 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उदघाटन केल्यानंतर शिंदे शिवसंकल्प अभियानातील पहिल्या सभेसाठी राजगुरुनगरला हेलिकॉप्टरने जाणार आहेत. तेथील सभा आटोपून ते पुन्हा उद्योगनगरीत मावळ लोकसभेच्या या अभियानातील मेळाव्यासाठी किवळे येथील मुकाई चौकात संध्याकाळी येणार आहेत.त्यानंतर शिवसेना खासदार असलेल्या व त्यांनी गतवेळी निवडणूक लढलेल्या मतदारसंघात ते जाणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT