Hit and Run Act : मोठी बातमी! ट्रक चालकांचा संप मागे; 'हिट अॅण्ड रन' कायद्याबाबत सरकारने दिले 'हे' आश्वासन

Truck Driver Strike : ट्रान्सपोर्ट संघटनांचं कामगारांना कामावर येण्याचे आवाहन
Hit & Run Act :
Hit & Run Act :Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्र सरकारच्या नव्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या निषेधार्थ ट्रक आणि टँकर चालकांकडून देशभरात संप पुकारण्यात आला होता.यात देशाच्या विविध भागात संपात सहभागी झाले आहेत.मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या संपाचा परिणाम सर्वसामान्य जनजीवनावर झाला होता.पण आता या संपाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कायद्यानुसार 'हिट अँड रन'च्या आरोपींना दहा वर्षांचा कारावास आणि सात लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. या कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारतानाच संपाची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट चालकांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Hit & Run Act :
Bjp New Party Office News : ...अखेर वनवास संपला! पुण्यात भाजप थाटणार हक्काचं 'हायटेक' ऑफिस

हिटं अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्रान्सपोर्ट चालकांना दिले आहे. हा ट्रक चालकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. हिट अॅंड रनचा कायदा लागू झालेला नाही. ट्रान्सपोर्ट संघटनांचं कामगारांना कामावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांमधील बैठक संपली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हिट अॅण्ड रन कायद्याबाबत माहिती देताना म्हणाले होते, रस्ता अपघात घडवून घटनास्थळावरून पळून जाणाऱ्यांसाठी सरकारने कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. अशावेळी पीडितेला मरणासाठी सोडले जाते. अशा आरोपींवर नवीन हिट अँड रन कायद्यातील तरतुदी लागू होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्याच्या भारतीय दंड संहितेत अशी कोणतीही तरतूद नाही. हिट अँड रन(Hit And Run Act) प्रकरणात चालक न सांगता पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.याशिवाय 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

Hit & Run Act :
Pratap Dhakane : लोकप्रतिनिधी 'हप्ता' प्रकरणी प्रताप ढाकणे आक्रमक; भीक मांगो आंदोलन अन् नगरपालिकेत मोडतोड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com