Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Mantrimandal Vistar News : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा वार ठरला... 'या' दिवशीचे मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

Maharashtra Government Cabinet Distribution : दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Cabinet Expansion 2023 : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाणा झाले आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मंचरचा मुख्यमंत्री शिंदे यांचा कार्यक्रम रद्द केल्याचे आदेश आले आहेत. पर्यायाने पुढील दोनच दिवसात राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झाले, असे म्हणता येईल.

गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला असून तो कधी होणार असे म्हणता म्हणता या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीने कधी चंचुप्रवेश केला तो राज्याच्याही लक्षात आला नाही. मागील काही दिवसात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतली. मात्र, त्यांना उद्यापही खाते मिळालेले नाही.

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिंदे-फडणवीस व अजित पवार यांना दिल्लीत बोलावल्याचे समजते. त्यामुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांना निरोप देवून शुक्रवारी (ता.14) होणारे जेजुरी व मंचर येथील कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आधी मंत्रिमंडळ विस्तार मगच खातेवाटप ही शिंदे गटाची भूमिका कायम आहे. त्यातच अजित पवार गटाला अपेक्षित खाती मिळत नसल्याने तिढा कायम आहे. मंत्रिमंडळ होणाऱ्या खाते वाटपावरून चालू आसलेल्या चर्चेत शिंदे अडून बसल्याची व फडणवीस, पवार यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या गोष्टीवर आता दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील काही मंत्र्यांची महत्वाची खाती अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात येणार आहेत. काही मंत्र्यांना मंत्रिपदाचा करावा लागणारा त्याग व खातेबदलामुळे काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात येत असल्याने शिंदे गटाच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटातील मंत्र्यांचा आणि आमदारांचा विरोध आहे, यावर तोडगा निघालेला नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द झाल्यामुळे शुक्रवारी मंत्रिमंडलाचा विस्तार होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT