Eknath Shinde-Uddhav Thackeray-Aditya Thackeray Sarkarnama
पुणे

Eknath Shinde News : आदित्य ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा, म्हणाले....

Roshan More

Pimpri-Chinchwad : शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकहीसंधी ठाकरे पितापुत्र सोडत नाहीत. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जातात मात्र हातात काही पडत नाही, अशी टीका जाहीर सभांमधून आदित्य ठाकरे करत असतात. मात्र, या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीमुळे राज्याचा विकास खुटंला होता. सत्तेत राहण्याची संधी असताना देखील आम्ही बाहेर पडलो ते बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आम्ही दिल्लीत जातो ते विकास कामे मंजूर करून आणण्यासाठी. मुजरा करायला नाही, असे टोला शिंदे यांनी ठाकरे यांना नाव न घेता लगावला. शिवसंकल्प यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.6) पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. एका माणसाच्या भुमिकेमुळे राज्याचा विकास खुंटला. एकही सुट्टी न घेता मी काम करतो आहे, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामपंचायत निवडणुकीत पोचपावती

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. ही महायुतीच्या काळात झालेल्या यशाची पोचपावती असल्याचे मुख्मयंत्री म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकी देखील महायुती यश मिळवेल. महायुतीकडे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे विजय आपलाच, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठासून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT