Ajit Pawar : मनोज जरांगेंना अजित पवारांचे उत्तर, छगन भुजबळांना...

NCP : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे, असे देखील पवार यांनी सांगितले.
Manoj Jarange Patil-Ajit Pawar
Manoj Jarange Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान

Kalyan : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक आहेत. छगन भुजबळांना ते टार्गेट करतात तर भुजबळ तेखील त्यांना प्रत्युत्तर देतात. मात्र, अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना समज द्यावी असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत मेळाव्यात जरांगे पाटील यांना उत्तर दिलं.

Manoj Jarange Patil-Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : शिवसंकल्प यात्रेतून शिंदे गट उडविणार प्रचाराचा धुराळा

माझी मतं स्पष्ट असतात. मला जे बोलायचे असतं ते मी स्पष्टपणे बोलतो.आत्ताही मी आरक्षणाबाबत जी भूमिका मांडली त्यावर ठाम आहे. आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे यासाठी प्रयत्न करत आहे, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्ष बैठक घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेणे गरजेचे आहे. इतर आरक्षण जे कायद्याच्या चौकटीत टिकलं नाही. ते नेमकं का टिकलं नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यानुसार मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे, असे देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

तीनही पक्षाचे एकत्र मेळावे होणार...

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे चंद्रशेखर बावन्नकुळे, आणि शिवसेनेचे उदय सामंत यांच्या उपस्थितमध्ये महायुतीतील मित्र पक्षाची बैठक झाली आहे. इथून पुढे तिन्ही पक्ष एकत्र मेळावे घेणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र जाणार असे ठरले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी लक्ष ठेवावे...

ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी वाढली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे काही नाही. ठाणे जिल्ह्यात लोकसंख्या वाढली आहे. बाहेरून काम धंद्यासाठी लोक मोठ्या प्रमाणत ठाणे जिल्ह्यात आले आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणत झाल्याने काही अनधिकृत कामे इथे होतात. ते होऊ नये त्यासाठी कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. सध्या मुख्यमंत्री मुंबईत असतात. मी आज मेळाव्या निमित्त इथे आलो आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मी पोलिसांना सूचना करणे माझे काम आहे. म्हणून मी पोलिसांना सूचना केल्या, असे अजित पवार यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com