Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दोन-तीन दिवासंपुर्वी अजित पवार नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आणि या सर्व चर्चांवर पडदा टाकला. पण पुण्यात मात्र काहीतरी वेगळचं सुरु असल्याचं दिसत आहे. (Chief Minister in the mind of the people; Ajit Pawar's banner in Pune sparks discussions again)
पुण्यातील कोथरुड परिसरात अजित पवार यांचे बॅनर सध्या लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा मजकूर छापण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे या बॅनर्सवर लिहिलं असून त्यावर अजित पवार यांचा भला मोठा फोटोही आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्या दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचाही फोटो आहे. (Maharashtra Politics)
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी शुक्रवारी (२१ एप्रिल) विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ''2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे, असं रोखठोक विधानही केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर एका रात्रीत कोथरूडमध्ये अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागले.
काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, होय 100 टक्के आवडेल. तसेच त्यांना 2024 ला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,''2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे'', असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.
अजित पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचं इतकं आकर्षण का? या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ''2004 सालीच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल एवढ्या जागांची संख्या जनतेने राष्ट्रवादीला दिली होती. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षाची शिस्त राहावी, यासाठी वरिष्ठ सांगतील तसं ऐकावं लागतं. 2004 मध्ये आमची काँग्रेससोबत आघाडी होती. 71 जागा आमच्या आल्या होत्या''.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.