Pune News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपबाबतही भाष्य केलं.
''भाजप 2014 आणि 2019 पर्यंत सर्वदूर पोहोचलं. याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत'', असंही ते म्हणाले. तसेच ''2014 मध्ये मोदी आले आता उद्याच्या काळात भारतात आणखी कुणी एखादा नेता उदयाला येऊ शकतो'', असंही ते यावेळी म्हणाले.
अजित पवार म्हणाले, ''भाजप फक्त काम करत नाही. तर भाजपला बळ देण्याचं काम अजूनही काही ग्रुप करतात. त्यामध्ये आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा, भारतीय किसान संघ, विश्व हिंदू परिषद असे वेगवेगळे ग्रुप त्यांच्यामध्ये काम करतात. पण हे जरी असलं तरी जनतेनं ठरवलं की यांना निवडून द्यायचं तर त्यांना ते निवडून देतात'', असं ते म्हणाले.
''आता देशात 2014 मध्ये मोदी आले. उद्याच्या काळात भारतात आणखी कोणी एखादा नेता उदयाला येऊ शकतो. जो देशाचा आणि नागरिकांचा विश्वास संपादन करु शकतो. त्यामुळे कुणाचं कुणापासून नडतं नसतं. असा एखादा काही मुद्दा निर्माण होऊ शकतो की त्यांच्या मनात जर तो रुजला तर बदलही घडू शकतो'', असं भाष्य त्यांनी आज केलं.
(Ediited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.