Eknath shinde
Eknath shinde Sarkarnama
पुणे

मुख्यमंत्री शिंदेंची संवेदनशीलता : ताफा थांबवून घेतला आंदोलकांचा मोबाईल नंबर!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसह राज्याचा दौरा सुरू केला आहे. ते आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पुणे विभागातील अनेक विषयांचा आढावा पुण्याच्या विधान भवनात घेतला. विभागीय आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्याचवेळी त्यांची नजर विभागीय आयुक्तालय कार्यालयाबाहेर मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या आंदोलनकर्त्यांकडे गेली. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून त्यांची भेट घेत नियमानुसार पुनर्वसन करण्याचा शब्द दिला. तसेच, पाठपुराव्यासाठी दोन आंदोलनकर्त्यांचा मोबाईल नंबरही घेतला. त्यांच्या या कृतीची पुण्यात चर्चा रंगली आहे. (Chief Minister Shinde met those agitating for rehabilitation and took mobile number!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात विधान भवनला दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी त्यांचे स्वागत केलं. पुण्यातील हडपसर भागातील उद्यानाच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी तोडगा काढत धर्मवीर आनंद दिघेंचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पुणे विभागातील अनेक विषयांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उदय सामंत, श्रीरंग बारणे उपस्थितीत होते. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित नव्हते.

पुणे दौऱ्यात विभागीय आढावा बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्याचवेळी त्यांची नजर विभागीय आयुक्तालय कार्यालयाबाहेर मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या आंदोलनकर्त्यांकडे गेली. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून त्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं जाणून घेत, नियमानुसार तुमचं पुनर्वसन आपण नक्की करू, असा शब्दही मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. विशेष म्हणजे दोन आंदोलनकर्त्यांचा मोबाईल नंबरही त्यांनी पाठपुराव्यासाठी नेला आहे.

आढावा बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोविड स्थिती आणि विविध योजनांचा आढावा घेतला. अठरा वर्षांपुढील सगळ्यांना बूस्टर डोस मिळावा, याची चर्चा झाली. तीर्थक्षेत्र विकासाचा वेग वाढवणे, रिंगरोडबाबत चर्चा झाली. केंद्राशी निगडीत प्रकल्प, आणि संबंधित प्रलंबित प्रश्नांची सूची करण्याची सूचना केली आहे. घराघरावर तिरंगा फडकला पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन सगळ्यांनी एकत्र काम करावे लागेल. लोकांचे लवकर काम व्हावे. दर्जेदार व्हावे, असा उद्देश आहे. क्वालिटीसाठी मॉनिटरिंग झाले पाहिजे. लोकप्रतिनिधीच्या सूचनांचा विचार शासन सकारात्मक करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT