Chitra Wagh Sarkarnama
पुणे

चित्रा वाघांचं शरद पवारांना साकडं; साहेब आता तुम्हीच लक्ष घाला !

भारतीय जनता पार्टीच्यावतीने या मुलीला शक्य ती सर्व मदत करण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुलीच्या वयाहून कमी असणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शिवसेनेच्या रघुनाथ कुचिक याला जामीन लगेच मिळतोच कसा, अशा प्रश्‍न करून या प्रकरणी पिडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष घातले तर या मुलीला न्याय मिळेल, असा विश्‍वास वाघ यांनी व्यक्त केला.

१६ फेब्रुवारीला या पिडीत मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर लगेच २१ तारखेला कुचिक याला जामीन मिळाला.अशा प्रकरणात लेगच जामीन मिळाला कसा.पोलीस नेमके काय करीत आहेत. गुन्हेगारांना मदत करण्याचेच काम पोलीस करताना दिसत आहेत, असा आरोप वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘‘पोलिसांकडून पिडीत मुलीला न्याय मिळेल असे वाटत नाही.पुण्याचे पोलीस पिडीतेला मदत करण्याऐवजी गुन्हेगारला मदत करण्यात गर्क आहेत.पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पिडीत मुलीने अनेक राजकीय लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनादेखील भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मुलगी पवार यांच्यापर्यंत पोचू शकली नाही.या प्रकरणात पवार यांनी लक्ष घातले तर त्या मुलीला न्याय मिळेल, असा विश्‍वास वाटतो.’’

भारतीय जनता पार्टीच्यावतीने या मुलीला शक्य ती सर्व मदत करण्यात येत आहे.मात्र, सत्तेत असलेल्या नेत्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने अत्याचार करूनदेखील मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, याबद्दल वाघ यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

पिडीतेला न्याय मिळावा यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मात्र, माध्यमांनीदेखील या विषयाला फार प्रसिद्धी दिली नाही, याबद्दल वाघ यांनी खंत व्यक्त केली.गेल्यावर्षी आजच्याच दिवशी शिवसेनेचा मंत्री संजय राठोड याने केलेल्या बलात्कार प्रकरणाला वाचा फोडली होती.वर्ष पूर्ण होताच शिवसेनेच्याच राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या कुचिक विरोधात पुन्हा बलात्कार प्रकरणात पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचे वाघ यांनी सांगितले.पक्ष कोणताही असो.स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणात सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन वाघ यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT