...असा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा

पुण्यात आल्यानंतर सर्वात आधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा मार्चला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात आल्यानंतर सर्वात आधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे.त्यानंतर मेट्रोसह विविध विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे.

Narendra Modi
बबनदादा, सोपलांच्या ‘श्रेष्ठी पदावर’ शिक्कामोर्तब: बिनविरोधच्या अपयशाचे उट्टे निवडणुकीत काढले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हस्ते वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. नदी सुधार प्रकल्पाचे आणि नदीकाठ सुधार प्रकल्पांचे यांचे भूमिपूजन, पंतप्रधान आवास योजनेतील घरांची लॉटरी काढणे यासह इतर कार्यक्रम होणार आहेत.

Narendra Modi
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ दहशतवाद्यांचे समर्थक!

सहा मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास पंतप्रधान मोदी पुण्यात लोहगाव विमानतळावर पोहोचतील.तेथून ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण करणार आहेत. दहा मिनिटात हा कार्यक्रम झाल्यावर तेथून गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवरून मेट्रोने आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत. मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर कोथरूड येथे ‘एमआयटी’ महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे. तेथे सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन होईल. सभेनंतर हेलिकॉप्टरने सिंबायेसिसच्या लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी तीनच्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्‍र्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ व काही विकासकामांची उद्धघाटने करत भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.गेल्या पाच वर्षात केलेले काम पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पुणेकरांसमोर ठेवून निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात करण्याचे नियोजन शहर भाजपाने केल्याचे मानले जात आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com