Pune News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडकरांपेक्षा पुणेकर वीजबील थकविण्यात आघाडीवर; ३५ कोटींची थकबाकी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : वीजचोरी आणि थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) ग्राहकांचे वीज जोड खंडित करण्याच्या कारवाईला आता वेग दिला आहे. दरम्यान, पुण्यापेक्षा उद्योगनगरीत (पिंपरी-चिंचवड) औद्योगिक वीज ग्राहक थकबाकीदार आणि थकबाकीची रक्कमही अधिक आहे.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील ६ लाख ३६ हजार ५४१ ग्राहकांकडे १४६ कोटी १४ लाख रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. त्यात बहुतांश ५ लाख ४९ हजार ३९७) हे घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे ९३ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. ७५ हजार ४७ वाणिज्यिक ग्राहकांकडे ३३ कोटी ६८ लाख रुपये, तर १२ हजार ९७ औद्योगिक ग्राहकांकडे १८ कोटी ९६ लाख रुपयांचे वीजबील थकित आहे.

पिंपरी-चिंचवडपेक्षा (१ लाख १ हजार ३५) पुण्यात (२ लाख ४२ हजार,९३७) ग्राहकांची संख्या मोठी आहे. पुण्यातील या ग्राहकांकडे ३४ कोटी ८२ लाख रुपये, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १८ कोटी ५० लाख रुपये थकलेले आहेत. मात्र, औद्योगिक वीज थकबाकीदार हे पिंपरी-चिंचवडला (४ हजार ७९६) अधिक असून त्यांची ८ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तर, ती पुण्यात ३ हजार २२४ या ग्राहकांकडे १ कोटी ८४ लाख रुपयांची आहे. पुण्यात ३७ हजार ८७९ वाणिज्यिक ग्राहकांनी १३ कोटी ३४ लाख रुपये, तर पिंपरी-चिंचवडमधील १६ हजार ९३५ वाणिज्यिक ग्राहकांनी ८ कोटी ७ लाख रुपयांचे आपले वीज बिल भरलेले नाही.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये १ लाख ९६ हजार ४२४ घरगुती ग्राहकांकडे ४० कोटी १६ लाख रुपये, २० हजार २३३ वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटी २५ लाख रुपये, ४ हजार ७७ औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT