Road construction : अकोला-अकोट रस्ता झाला टिंगल टवाळीचा विषय! चित्रफीत व्हायरल...

Social Media : याबाबतचा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Akola to Akot Road
Akola to Akot RoadSarkarnama

Akola to Akot Road News : एखाद्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी किती वेळ लागावा, याला वेळेच्या काही मर्यादा असतात. एकीकडे देशभर सर्वाधिक लांबीचे रस्ते विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले जात आहेत. पण अकोला-अकोट दरम्यानचा अवघ्या ४५ किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी लागत असलेला दीर्घकाळ हा टिंगल टवाळीचा भाग ठरला आहे. (Roads are being built and completed in record time.)

याबाबत एका युवकाने मिस्कील चित्रफीत तयार करून लग्नापासून ते वृद्धावस्थेपर्यंतही रस्त्याचे काम कसे सुरूच आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रफितीच्या माध्यमातून मित्रांसोबतचा याबाबतचा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या एका महामार्गाचा भाग असलेल्या अकोला-अकोट रस्त्याचे बांधकाम सन २०१५ पासून सुरू आहे.

२०२३ साल उजाडल्यानंतरही या रस्त्याचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परंतु अकोट-अकोट रस्त्याबाबत या संतापाची जागा आता विनोदाने घेतली आहे. हा रस्ता विनोदाचा एक भाग बनला. यावर सोशल मिडियातून एक ना अनेक विनोद दररोज व्हायरल होत आहेत. असाच अकोट रस्त्याबाबतचा दोन मित्रांमधील एक विनोदी संवाद सध्या सोशल माध्यमावर धुमाकूळ घालतोय.

रस्त्याचे बांधकाम कसे एका युवकाच्या मुलगी बघण्याच्या प्रसंगापासून ते त्याच्या वृद्धापकाळापर्यंतही सुरूच असल्याचे दाखविण्यात आले आहे. यातील विनोदाची अतिशयोक्ती बाजूला ठेवली तरी एखाद्या रस्त्याबाबत होत असलेला विलंब हा संतापाच्या ऐवजी विनोदाचा कसा भाग होत आहे आणि त्यातून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या डोळ्यात कसे झणझणीत अंजन घातले जात आहे, हे दिसून येते.

Akola to Akot Road
Akola : पाणी आरक्षण, पूल अन् राजकीय ट्रँगल, भाजप, वंचित, शिवसेनेत रंगले वाकयुद्ध !

काय आहे या चित्रफितीत?

एक युवक सन २०१८ मध्ये मुलगी बघण्यासाठी अकोटला जाण्याकरिता मित्राला फोन करून रस्त्याच्या बांधकामाबाबत विचारणा करतो. तेव्हा मित्र फोनवरून त्याला रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, त्याला दुसऱ्या रस्त्याने येण्यास सांगतो. त्यानंतर सन २०२३ मध्ये त्या युवकाचे लग्न झाल्यानंतर पुन्हा हाच संवाद होतो. तेव्हाही अकोला (Akola) - अकोट रस्त्याचे बांधकाम सुरूच असल्याचे मित्र सांगतो.

पुढे हा संवाद सन २०२४...., सन २०२८...., सन २०३०...आणि संवाद करणारे युवक वृद्धापळात गेल्याचे दाखवून सन २०५० मध्येही रस्त्याचे बांधकाम सुरूच आहे, असे दाखवून या रस्त्याबाबत चित्रफितीतून विनोद करण्यात आला आहे. या विनोदी चित्रफितीतून नागरिकांमध्ये रस्त्याच्या रखडलेल्या बांधकामावरून किती रोष आहे, हे दिसून येते.

Akola to Akot Road
Akola News: वर्ष झाले; महानगरपालिकेवर प्रशासक राज कायम, इच्छुकांचा तयारीला ब्रेक !

लोकप्रतिनिधींचे डोळे उघडतील काय?

एखाद्या विकास कामांवरून कसे राजकारण (Politics) रंगू शकते, हे नुकतेच गांधीग्राम पुलासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरून संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले. मात्र, त्याचवेळी सन २०१५ पासून जिल्ह्यातील जे रस्ते रखडले आहे, ते वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कधी पुढाकार घेताना दिसले नाही.

नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यासाठी सोशल माध्यमांचा वापर करून विनोदी चित्रफिती व्हायरल केली जात आहे. यातून तरी लोकप्रतिनिधींचे (Leaders) डोळे उघडतील आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com