Devendra Fadnavis seen offering flowers at Chhatrapati Shivaji Maharaj’s feet during Ganpati visarjan, sparking a major political ad controversy. Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : CM फडणवीसांच्या पेपरमधील 'त्या' जाहिराती कोणी दिल्या? रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा म्हणाले, "भाजपने नव्हे तर, मित्रपक्षातील..."

Devendra Fadnavis Ad Controversy : गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात झळकली. काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाता दिसत होते.

Sudesh Mitkar

Pune News, 07 Sep : गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात झळकली. काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाता दिसत होते.

तर काही वृत्तपत्रातीत ते गणपती बाप्पाला नमस्कार करतानाचा फोटो होता. या जाहिरातीमध्ये फोटो खेरीज फक्त मजकूर स्वरूपात 'देवाभाऊ' इतकच लिहिलं होतं. त्यामुळे ही जाहिरातबाजी नेमकी कोणी केली? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत.

ही जाहिरात सरकारनी दिली की? खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली, की फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांनी अथवा भाजपाच्या कोणत्या आमदाराने केली. याबाबत काल दिवसभर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्याच्या पाहायला मिळाल्या.

मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीसोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत वेगळाच खुलासा केला आहे. शिवाय या जाहिरातीवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली.

परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्याचं समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत.

तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. असा खुलासा पवार यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. त्यांनी पुढे लिहिलं की, मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता ही जाहीरात नेमकी कोणी दिली आणि मित्र पक्षातील म्हणजे अजितदादांच्या की एकनाथ शिंदेंच्या नेत्याने ही जाहिरात दिली? याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT