Pune News : मुरुम उत्खननावरून सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी, डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून वाद झाले. त्यानंतर या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या प्रकरणानंतर अजित पवार हे महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकवत असल्याचं सांगत विरोधकांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली. हा वाद वाढत असताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र, आता या महिला अधिकाऱ्याला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबर-पाटील यांनी दिले आहे.
ज्या गावात कुर्डू गावात कारवाई करण्यात आली होती तेथील गावकऱ्यांनी अवैध उत्खनन सुरू नसल्याचे सांगितले. तसेच आयपीएस मॅडमनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे म्हटले. त्याविषयी ग्राऊंड रिपोर्ट काही न्यूज चॅनेल्सने केला. त्यावर व्यक्त होताना रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, 'कुर्डु गावकऱ्यांवर खोटे 353 गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अजिबात काळजी करू नका भावांनो तुमची बहीण वकील आहे. अख्खा वकील परिवार उभा करेल. कायद्याने आयपीएस मॅडमला कोर्टात खेचू आणि दाखवून देऊ कायद्याच्या पुढे तुम्ही काही नाही.'
'वायरल म्हणजे वायरल जेवढे चांगले तेवढेच वाईट. मग खरे खोटे गेले उडत, अशी परिस्थिती किती केली तरीही सत्य लपत नाही. खुद्द गावकऱ्यांनी केला भांडा फोड. आता आख्खे गाव योग्य की आयपीएस मॅडम अतिशहाण्या योग्य? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की, गावच्या रस्त्यासाठी मुरुमाचे उत्खनन सुरू होते. त्यासाठी परवानगी देखील घेतली होती. मात्र, आयपीएस महिला अधिकारी गावामध्ये सिंघम प्रमाणे घुसल्या त्यानंतर त्यांनी थेट रिव्हालवर काढत डंपर चालकाला लावला. फक्त मिस कम्युनिकेशन मुळे हाच सगळा घटनाक्रम घडला. तसेच या प्रकरणी अन्यायकारकरित्या गावातील 20 एक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.