Abhimanyu pawar medha kulkarni (1).jpg Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni: मुख्यमंत्र्यांच्या समोरच भाजप नेत्यांमध्ये उडाले खटके; आमदाराचा 'तो' टोमणा अन् संतापलेल्या मेधा कुलकर्णींनी कार्यक्रमच सोडला

Abhimanyu Pawar Vs Medha Kulkarni: पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतरही भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खटके उडाल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भाजपच्या राज्यसभा खासदार आणि आमदारांमध्ये राजकीय नाराजीनाट्याचा अंक रंगल्याचं दिसून आलं.

Deepak Kulkarni

Pune News: पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतरही भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खटके उडाल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भाजपच्या राज्यसभा खासदार आणि आमदारांमध्ये राजकीय नाराजीनाट्याचा अंक रंगल्याचं दिसून आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात शुक्रवारी (ता.26) युपीएससी, एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरुन आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी टोमणा मारला.

मराठवाड्यातील औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मारलेल्या टोमण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार पवार यांनी मारलेला टोमणा खासदार मेधा कुलकर्णी यांना प्रचंड खटकला. यामुळे संतापलेल्या कुलकर्णी या कार्यक्रम आहे तसा अर्धवट सोडून देत निघून गेल्या.

भाजप खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमास्थळी पोहोचल्यानंतर मंचावर आल्या. यावेळी तिथे पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असा टोमणा मारला. या टोमण्यामुळे खासदार मेधा कुलकर्णींचा पारा चढला.

सूडबुद्धी का तयार होते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून राज्यात खळबळ उडवून दिलेल्या लोहगड केतन अग्रवाल प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यामागे सामाजिक अँगल तपासला पाहिजे. ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे असंही फडणवीस यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT