Abhimanyu Pawar: संभाजी पाटील निलंगेकरांच्या खेळीनं अभिमन्यू पवारांचं गणित बिघडलं! झेडपी अध्यक्षपदाची औशाची संधी हुकली

Abhimanyu Pawar: लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भाजपाला मिळाला. सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच्या युतीमुळे भाजपाच्या उषा तळेगावकर या झेडपीच्या कारभारी ठरल्या.
MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur NewsSarkarnama
Published on
Updated on

-- जलील पठाण

Abhimanyu Pawar: लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भाजपाला मिळाला. सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच्या युतीमुळे भाजपाच्या उषा तळेगावकर या झेडपीच्या कारभारी ठरल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद सुरवसे हे उपाध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे लाडके अभिमन्यू पवार यांना मात दिली.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Ranjan Gogoi: अखेर माजी CJI रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त! 6 वर्षात एकही विचारला नाही प्रश्न, एकदाच चर्चेत सहभाग

संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खेळीने कधी नव्हे ती औसा विधानसभा मतदारसंघाकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद येण्याची संधी हिरावली गेली. निलंगेकर यांनी या खेळीतून आपले राजकीय वजन पुन्हा एकदा सिध्द केले, तर आमदार अभिमन्यू पवार यांना जिल्ह्याच्या राजकारणात दुसर्‍यांदा माघार घ्यावी लागल्याची चर्चा होत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी औसा तालुक्याला मिळेल, अशी अपेक्षा होती.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Rajya Sabha Result: अखेर भाजपचा घोडेबाजार यशस्वी! ओडिशात काँग्रेस, बिजू जनता दलाचे ११ आमदार फोडले; भाजप समर्थित उमेदवाराचा विजय

भाजपाच्या लोदगा गटातून निवडून आलेल्या पूनम मुक्ता यांचे नाव जवळपास अंतिम मानले जात होते. आमदार अभिमन्यू पवारांकडूनही त्यांच्या उमेदवारीसाठी थेट वरपासून खालपर्यंत मजबूत प्रयत्न सुरू होते. परंतु अंतिम क्षणी घडलेल्या 'त्या' राजकीय हालचालींनी सगळे समीकरणच बदलले. सोमवारी दुपारनंतर राजकारणाने अचानक वेग घेतला. संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपली बाजू भारी करण्यासाठी जोरदार 'फिल्डिंग' लावली.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Top 10 News: आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ... ते बीडमध्ये घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीला बांधून ठेवलं

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनीही आपले राजकीय वैर आणि मतभेद लक्षात घेऊन मुक्तांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला. लिंगायत समाजातून अध्यक्ष व्हावा या आमदार पवारांच्या भूमिकेला शेख यांनी पाठबळ न देता निलंगेकरांच्या बाजूने कौल दिला. या एकीने भाजपच्या औसा–लोदगा गटाच्या अपेक्षांना कात्री लागली. शेवटी उषा पाटील तळेगावकर यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद निलंगा तालुक्यालाच मिळाले.

औसा तालुक्यातून निवडून आलेल्या पूनम मुक्तांचे नाव जवळपास अध्यक्ष पदासाठी निश्चित मानले जात होते. पण शेवटच्या क्षणी चक्रे फिरल आणि उमेदवारीही फिरली. यामुळे पवार समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. आमदार आग्रही असताना आणि जिल्हाध्यक्षही लिंगायत असताना अध्यक्षपद दुसरीकडे का? असा प्रश्न विचारत भाजपानेच समाजावर अन्याय केला, अशा प्रतिक्रिया आता समाज माध्यमातून उमटू लागल्या आहेत.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Jitendra Awhad : आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा राडा; नेमकं काय घडलं?

या निमित्ताने पुन्हा एकदा निलंगेकर विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष दिसून आला. वरवर पक्षात सर्व आलबेल असल्याचे सांगीतले जात असले, तरी या अध्यक्ष निवडीने पवार–निलंगेकर संघर्षाची धार पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे दिसून आले. निलंगेकरांच्या रणनीतीतून पवारांची गणिते बिघडली आणि औसा तालुक्याला हाताशी आलेले अध्यक्षपद शेवटच्या क्षणी निसटले.

या संपूर्ण उलटफेरीमुळे औसा तालुक्यात तीव्र नाराजी आहे. 'इतिहासात पहिल्यांदा मिळणारी संधी घरच्या घरातल्या राजकारणाने गमावली' अशा भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. आता आमदार अभिमन्यू पवार या राजकीय धक्यावर काय पाऊल उचलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निलंगेकरांच्या चालीत हरलेले गणित औसा तालुक्याच्या भविष्यात नेमका काय बदल घडवते? हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com