

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याभरात तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचं यामुळं चांगचंल धाबं दणाणलं असून कोट्यवधी रुपयांचा बनावट माल जप्त करुन शेकडो लोकांना या कारवाईत गुन्हे दाखल करुन अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुटखा आणि बनावट औषधांचा तब्बल ७० कोटींचा बेकायदा व्यवसायाचं रॅकेटही त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. या सर्व कारवायांच्या पार्श्वभूमीवर आता तुकाराम मुंढे यांनी आपलं पुढचं पाऊल काय असेल हे स्पष्ट केलं असून ही तर केवळ सुरुवात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच नेतृत्वाचा उल्लेलख करत त्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीबाबत स्पष्ट संकेतही दिले आहेत. हे सांगताना फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तुकाराम मुंढे म्हणतात, ही तर केवळ सुरुवात आहे…..नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे; तर भावी पिढ्यांना अधिक निरोगी, सुरक्षित आणि सक्षम समाज देणाऱ्या व्यवस्था निर्माण करणे होय. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे ही कुणावर केलेली कृपा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नाही, ती मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी आहे. अन्नामध्ये भेसळ होते, औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड होते किंवा नागरिकांची दिशाभूल होते, तेव्हा त्याची किंमत केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित राहत नाही तर जीवितहानी, विश्वासाचा ऱ्हास आणि समाजाच्या कल्याणावर त्याचा परिणाम होतो.
आपले ध्येय केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे इतकेच मर्यादित नाही. आपल्याला अशा संस्था उभाराव्या लागतील ज्या विश्वास निर्माण करतील, प्रामाणिकतेला प्रोत्साहन देतील, नवकल्पनांना चालना देतील आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी नागरिकांना ठेवतील. अधिक निरोगी भविष्य विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामुहिक जबाबदारी यांवर उभे राहील. आपण आता केवळ सुरुवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.